युनूस शेखइस्लामपूर : सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वाटपाशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या नावाचा विनाकारण अपप्रचार केला जात आहे. जिल्ह्यात काहीही झाले, तरी त्याच्याशी माझा संबंध जोडणे योग्य नाही. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १३ जागांची मागणी केली होती. मात्र, १० जागा मिळाल्या. ३ जागा सोडाव्या लागल्या. जागा वाटपात जे झाले ते झाले. सर्वांनी आघाडी धर्म पाळायला हवा, अशी भावना असल्याचे मत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.इस्लामपूर येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील यांच्यासह काँग्रेस वगळता राष्ट्रवादी व उद्धवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, आपण गांभीर्याने घेतले नाही, तर ही लोकसभेची शेवटची निवडणूक ठरेल, याचे भान ठेवून कामाला लागा असे आवाहनही त्यांनी केले.
सांगलीच्या उमेदवारी वाटपाशी माझा संबंध नाही - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 11:30 IST