माजी नगरसेवकाने पत्नीला पळवून नेल्याची पतीची तक्रार, आष्टा शहरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 16:28 IST2022-07-19T16:27:50+5:302022-07-19T16:28:14+5:30
संबंधित महिला आठ-दहा दिवसांपासून बेपत्ता

माजी नगरसेवकाने पत्नीला पळवून नेल्याची पतीची तक्रार, आष्टा शहरात खळबळ
आष्टा : वाळवा तालुक्यातील विवाहित महिलेला माजी नगरसेवकाने पळवून नेल्याची तक्रार संबंधित विवाहितेच्या पतीने आष्टा पाेलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
संबंधित महिला आठ-दहा दिवसांपासून बेपत्ता आहे. तिच्या पतीस एका माजी नगरसेवकानेच तिला पळवून नेल्याचा संशय आला. त्यामुळे ताे आठ दिवसांपूर्वी संबंधिताकडे पत्नीबाबत चौकशी करण्यासाठी गेला. यावेळी संबंधित माजी नगरसेवकाने त्याला मारहाण करून धमकी देऊन हाकलून दिले. ‘पोलिसांकडे गेल्यास गाठ माझ्याशी आहे’ अशी धमकी दिल्यामुळे महिलेच्या पतीने पाेलिसात तक्रार दिली नव्हती.
मात्र शनिवारी बेपत्ता पत्नीबाबत चौकशी केल्याच्या रागातून संबंधित माजी नगरसेवकाने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे त्यानेच आपल्या पत्नीस फूस लावून पळवून नेले असून, त्याची चाैकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महिलेच्या पतीने केली आहे.