शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले, पण सेनापती कुठाय?

By admin | Updated: June 27, 2016 00:45 IST

तासगाव शहराध्यक्षपद रिक्त : अजय पाटील, अमोल शिंंदे यांच्या नावाची केवळ चर्चाच; सेनापतीच नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी लढाईची पूर्वतयारी सुरू केली आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावात येऊन कार्यकर्त्यांना रिचार्ज करीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले, पण सेनापतीच नसल्याने सैन्य संभ्रमात सापडले आहे. सेनापतीशिवाय सैन्य धावणार तरी कसे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक महिन्यांपासून तासगाव शहराध्यक्षपद रिक्त आहे. नगरसेवक अमोल शिंंदे आणि अजय पाटील यांच्या नावाची केवळ चर्चा होत आहे. मात्र निर्णय झाला नाही. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात तालुक्यातील ग्रामीण भागाच्या तुलनेत तासगाव शहरात राष्ट्रवादीची मोठी वाताहत झाली. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली पालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात गेली. पक्षातील चार नगरसेवक भाजपच्या वळचणीला गेले, तर नेत्यांचा आदेश धुडकावून काही नगरसेवकांनी भाजपच्या नगराध्यक्ष निवडीसाठी रसद पुरवली. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीचे अस्तित्व शोधण्याची वेळ आली. अमोल शिंंदे यांचा अपवाद वगळता सर्वच नगरसेवकांनी भाजपशी सत्तेची सोयरिक केली होती. आता पालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. राष्ट्रवादीकडूनही विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न होत आहे. काही दिवसांपूर्वी बाजार समितीत आर. आर. पाटील यांच्या पुतळा अनावरणाच्या निमित्ताने अजित पवार तासगावात आले होते. मेळाव्याचे निमित्त साधून त्यांनी तासगाव नगरपालिका निवडणुकीचे रणशिंंग फुंकले.निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राष्ट्रवादीत उत्साह संचारला आहे. मात्र सेनापती म्हणून पक्षाची जुळवाजुळव करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. अनेक पदाधिकाऱ्यांचा कारभार ‘एकला चलो रे’प्रमाणे सुरू आहे. आर. आर. पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदाची धुरा महादेवराव हिंंगमिरे यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्या निधनानंतर अद्यापपर्यंत हे पद रिक्त आहे. चर्चा झाली, पुढे काय?शहराध्यक्ष निवडीसाठी काही महिन्यांपूर्वी सूतगिरणीत शहरातील कार्यकर्त्यांची आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यावेळी अमोल शिंंदे आणि अजय पाटील यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र या बैठकीनंतर निवडीबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे शहराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याची कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षांची निवड केली जाईल, अशी चर्चाही आहे. मात्र सध्या तरी शहरात सेनापतीशिवाय राष्ट्रवादीचे सैनिक असल्याचे चित्र आहे.