शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पदाच्या निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपला पायउतार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने कंबर कसली असतानाच भाजपनेही सत्ता कायम ठेवण्याचा चंग बांधला आहे. त्यातून ...

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपला पायउतार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने कंबर कसली असतानाच भाजपनेही सत्ता कायम ठेवण्याचा चंग बांधला आहे. त्यातून नगरसेवकांचा भाव चांगलाच वधारला असून घोडेबाजार तेजीत आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. भाजपचे नऊ सदस्य अजूनही संपर्काबाहेर आहेत. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादीत महापौरपदाचा उमेदवार कोण? याचा तिढा सुटलेला नाही. महापालिकेच्या सत्तेचा सोपान कोणाला पावणार, याची अजूनही अनिश्चितता आहे.

महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी २३ फेब्रुवारी रोजी निवडणुक होत आहे. तत्पूर्वी गुरुवारी सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी व उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांचे अर्ज दाखल करण्यात आले तर विरोधी काँग्रेसकडून महापौर पदासाठी उत्तम साखळकर व राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान व दिग्वीजय सूर्यवंशी यांनी तर उपमहापौर पदासाठी अनुक्रमे उमेश पाटील, सविता मोहिते, स्वाती पारधी यांनी अर्ज दाखल केले. अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत मोठी कसरत करावी लागत आहे. भाजपचे १२ ते १५ नगरसेवक असंतुष्ट आहेत. त्यापैकी ९ नगरसेवक दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. अजूनही हे नगरसेवक भाजप नेत्यांच्या संपर्काबाहेर आहेत. दरम्यान शुक्रवारी भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आल्याचे समजते.

दुसरीकडे महापालिकेतील सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीनेच गळ्याला लावले आहे. हे सर्व नगरसेवक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचे समजते. भाजपच्या या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीत अजूनही महापौर पदाच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. काँग्रेसने शुक्रवारीही महापौर पदावर दावा कायम ठेवला आहे. तर राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान की दिग्वीजय सूर्यवंशी असा वाद सुरू आहे. त्यात भाजपच्या नगरसेवकांनी बंड पुकारल्याने त्यांना चांगलाच भाव आला आहे. दोन्ही बाजूंनी त्यांचे समाधान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यंदा महापौर निवडीत घोडेबाजार चांगलाच रंगला आहे.

चौकट

गोवा सहलीवर १७ नगरसेवक

महापालिकेत भाजपचे ४३ नगरसेवक आहेत. त्यापैकी ९ जण नाॅट रिचेबल आहेत. उर्वरित ३४ पैकी केवळ १७ नगरसेवकच गोवा सहलीवर गेले आहेत. उर्वरित सदस्य शहरातच आहेत. या सदस्यांशीही काँग्रेस-राष्ट्रवादीने संपर्क वाढविल्याचे समजते. दुसरीकडे भाजपनेही काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही सदस्य गळाला लागतात का, याची चाचपणी सुरू केली आहे.

चौकट

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञातस्थळी

भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्यांना फोडण्याचे प्रयत्न चालविण्याची कुणकुण लागताच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे सदस्य रवाना झाले तर रात्री राष्ट्रवादीच्या सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले. पण त्यांना कुठे नेण्यात आले याबाबत मात्र गोपनीयता पाळली जात आहे.

चौकट

बागवान की सूर्यवंशी

आघाडीत महापौर पदाच्या उमेदवारीचा घोळ अद्यापही सुरू आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. काँग्रेसने महापौर पदावरील दावा अजूनही सोडलेला नाही. तर राष्ट्रवादीतही बागवान की सूर्यवंशी हा तिढा कायम आहे. बागवान यांच्यासाठी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी जयंत पाटील यांच्याकडे शिफारस केल्याचे समजते. तरीही सूर्यवंशी यांचे पारडे जड असल्याचे पक्षातून सांगण्यात येत आहे.