शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी

By अशोक डोंबाळे | Updated: July 22, 2024 15:24 IST

जिल्ह्यात २८.२ मिलिमीटर पाऊस : कृष्णा नदीची पाणीपातळी २६ फुटांवर

सांगली : जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ७७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वारणा (चांदोली) धरण परिसर, वाळवा तालुक्यातील बहे, ताकारी आणि कासेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या ठिकाणी १०० ते १२५.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी २८.२ मिलिमीटर पाऊस झाला असून कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सोमवारी दुपारी २६ फुटापर्यंत पाणीपातळी पोहोचली आहे.जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरु झाला आहे. शिराळा तालुक्यात चरण, शिराळा, कोकरुड परिसरात अतिवृष्टी झाली आहे. वारणा-चांदोली धरण परिसरात चौवीस तासात १०४.८ मिली मीटर वाळवा तालुक्यातील बहे १२५.८ मि.ली., कासेगाव ९५.३ मि.ली., ताकारी परिसरात १२५.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या परिसरातील नागरिकांनी ढगफुटी सदृश्य असाच पाऊस होता, असे सांगितले. पावसाचा जोर वाढल्यामुळे सोमवारी दुपारी कृष्णा नदीचीसांगली आर्यविन पुल येथे २६ फुटापर्यंत पाणीपातळी गेली होती.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २१.५ (३४३), जत २ (२५५.८), खानापूर १२.१ (२७६.५), वाळवा ६०.८ (५१८.३), तासगाव १४.१ (३४२.४), शिराळा ७७.८ (७२२.१), आटपाडी २.४ (२२८.३), कवठेमहांकाळ ७.६ (३४०), पलूस ३२.३ (३५७.८), कडेगाव २२.७ (३४५).अलमट्टीतून दीड लाख क्युसेकने विसर्गअलमट्टी धरणात ९३.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणात सध्या एक लाख १५ हजार ४०६ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे अलमट्टी धरण प्रशासनाने सोमवारी एक लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढविण्यात येईल, असे अलमट्टी धरण प्रशासनाने सांगली पाटबंधारे मंडळाला आश्वासन दिले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसriverनदी