शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होण्यावर शिक्कामोर्तब, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:02 IST

मदत करणाऱ्यांना निधीत झुकतेमाप, दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा

सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेच्या नेत्यांच्या भेटी झाल्या आहेत. त्या आधारेच दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होईल, असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नूतन सदस्यांचा सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले की, राज्यात नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर १५९ ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष झाले. २९ महापालिकेपैकी २६ ठिकाणी महायुतीचे महापौर झाले. त्यात २१ भाजपचे महापौर आहेत. आता १२ जिल्हा परिषदेपैकी ७ ठिकाणी भाजपचे अध्यक्ष होणार आहेत. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गतवेळेच्या २५ पैकी १६ सदस्य निवडून आले. संख्या कमी आली तरी भाजपची मते वाढली आहेत. १८ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला दोन लाखावर तर भाजपला चार लाखापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. पण, निवडणुकीत हार-जीत महत्त्वाची असते. सध्या भाजपचे १६, राष्ट्रवादी (अजित पवार) ६, शिंदेसेना ७, रयत क्रांती व जनसुराज्य प्रत्येकी १ असे ३१ संख्याबळ महायुतीकडे आहे. तर, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस व उद्धवसेनेचे मिळून ३० सदस्य आहेत. हा निकाल पाहता महायुतीचाच अध्यक्ष होईल. आता युतीचे संख्याबळ कसे वाढेल, याचा आम्ही विचार करीत आहोत.

वाचा: कडेगावात मतदारांची विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला साथ; भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळनिकालानंतर आतापर्यंत राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेनेच्या नेत्यांच्या भेटी झाल्या. या दोन्ही पक्षांशी समन्वय करून महायुतीचा अध्यक्ष होणार आहे. यात कुठलीही शंका नाही. अध्यक्षपदाबाबत ते म्हणाले की, राजकारणात अंकापेक्षा समन्वय महत्त्वाचा असतो. २०२२ मध्ये भाजपकडे १२२ आमदार असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केेले होते. युतीतील कुठल्या पक्षाची अध्यक्षपदाची अट नाही. आम्ही समन्वय ठेवून निर्णय घेऊ. असे पत्ते ओपन केले तर मी नेता कसला? अशी मिश्किल टिप्पणीही केली.भाजपचा अध्यक्ष होणे सोपे नाही; महायुतीचाच ठरणार!जिल्हा परिषद निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याची कबुली देत भाजपने आत्मपरीक्षणाची भूमिका घेतली आहे. मात्र, या निकालानंतरही जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता स्थापन होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदासाठी भाजपकडे स्वतंत्रपणे आवश्यक संख्याबळ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अध्यक्षपद मिळविणे सोपे नसले, तरी महायुतीतील घटक पक्षाचाच अध्यक्ष होईल, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये अंकगणित आणि राजकीय समन्वय दोन्ही महत्त्वाचे ठरणार आहेत. भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने समीकरणे बदलली असली, तरी सत्तेच्या स्थापनेत महायुतीची आघाडी कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाचा: ..तर ठेकेदारावर कारवाई अटळ, सांगली जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त सीईओंचा इशारा मदत करणाऱ्यांना निधीत झुकतेमापजिल्हा परिषद, महापालिका सत्तास्थापनेसाठी शिंदेसेनेसह अन्य घटक पक्षांनी मदत केली आहे. या पक्षांना पहिल्या टप्प्यामध्ये पदे दिली आहेत. काही घटक पक्षांना पदे देऊ शकलो नाही त्यांना निधी देण्यात झुकतेमाप देणार आहे, तसेच पुढील अडीच वर्षांसाठी शिंदेसेनेला महापालिकेत संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance to form Sangli Zilla Parishad president: Chandrakant Patil claims.

Web Summary : Chandrakant Patil asserts the Mahayuti alliance will secure Sangli Zilla Parishad's presidency with support from NCP (Ajit Pawar) and Shinde Sena. Despite BJP's reduced numbers, increased vote share and strategic alliances ensure their victory. They will prioritize coordination over rigid power-sharing demands.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMahayutiमहायुतीchandrakant patilचंद्रकांत पाटील