Sangli: जत तालुक्यातील भूजल पातळीमध्ये घट, दोन तलाव पडले कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:16 IST2024-12-13T18:15:58+5:302024-12-13T18:16:36+5:30

विहिरी, कूपनलिकातील पाणीपातळी घटली : पाच तलावांतील पाणीसाठा मृत संचयाखाली

Groundwater level in Jat taluka decreases, two lakes dry up | Sangli: जत तालुक्यातील भूजल पातळीमध्ये घट, दोन तलाव पडले कोरडे

Sangli: जत तालुक्यातील भूजल पातळीमध्ये घट, दोन तलाव पडले कोरडे

दरीबडची : पाऊस कमी झाल्याने दुष्काळी जत तालुक्यातील भूजलपातळीतही घट झाली आहे. पाणीपातळी ४०० ते ५०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. परतीच्या पावसाने दडी दिल्याने तालुक्यातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. उमराणी, तिकोंडी हे दोन तलाव कोरडे पडले आहेत. तर उर्वरित तलावात पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे कूपनलिका, विहिरीतील पाणीपातळी कमी झाली आहे.

उन्हाची तीव्रतने विहिरी, कूपनलिका, बंधारे कोरडे पडू लागले आहेत. संख मध्यम प्रकल्पात पाणीसाठा कमी आहे. दुष्काळी परिस्थितीकडे वाटचाल सुरु आहे. पूर्व भागातील उटगी येथील दोड्डीनाला प्रकल्पात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले होते. तेथे पाणीसाठा बऱ्यापैकी आहे. गुगवाड, खोजनवाडी, दरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ बुद्रुक व बिळूर (केसराळ) या पाच तलावांतील पाणीसाठा मृत संचयाखाली आली आहे.

म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी 

देवनाळ कालव्यातून पाच्छापूर ओढ्यातून बोर ओढ्याला पाणी सोडले होते. तसेच सिद्धनाथ तलावात पाणी आले होते. विधानसभा निवडणूकपूर्वी पाणी बंद केले आहे. सध्या तलावात पाणीसाठा ५.४० दघलफू असून ताे मृत संचयाखाली आहे. सिद्धनाथ तलावातून पाणी बोर ओढ्यातून संख मध्यम प्रकल्पात जाते.

प्रकल्पाचे नाव पाणीसाठा (द.घ.ल.फू) मध्ये
दोड्डानाला : २१०.१८
कोसारी :  ३०.३६
येळवी :  ५१.५५
शेगाव क्र १ : २२१.४२
वाळेखिंडी :  ११३.३१
मिरवाड :  ५२.०२
डफळापूर : ४०.२५
बेळूखी :  ७५.४३
प्रतापूर :  ५५.९४
शेगाव क्र.२ : ३९.८७
सनमडी :  ६६.७५
रेवनाळ:  ७९.८५
बिरनाळ :  ८२.८६
तिप्पेहळ्ळी : ४३.८५
बिळूर-केसराळ : २८.१७
गुगवाड :  ६.७०
उमराणी :  ०.००
खोजनवाडी :  ८.३१
मध्यम प्रकल्प.संख : १०.१८
सिद्धनाथ :  ५.४०
जालिहाळ बुद्रुक : ४.२२
अंकलगी :  ५.००
पांडोझरी :  १२७.९७
तिकोंडी :  ०.००
भिवर्गी : ३०४.६६
सोरडी :  २०.०६
दरीबडची :  १.६२

Web Title: Groundwater level in Jat taluka decreases, two lakes dry up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.