सांगलीतील कोंगनोळीच्या ढवळे बंधूंची कमाल! द्राक्षाला मिळाला पाचशे एक दर 

By शरद जाधव | Published: October 2, 2023 12:09 PM2023-10-02T12:09:33+5:302023-10-02T12:11:56+5:30

हंगामातील पहिलेच द्राक्षे बाजारात दाखल

Grapes got five hundred and one rate in sangli, The first grapes of the season entered the market | सांगलीतील कोंगनोळीच्या ढवळे बंधूंची कमाल! द्राक्षाला मिळाला पाचशे एक दर 

सांगलीतील कोंगनोळीच्या ढवळे बंधूंची कमाल! द्राक्षाला मिळाला पाचशे एक दर 

googlenewsNext

शरद जाधव 

सांगली : बदलते पाऊसमान, वातावरणातील चढउतारालाही आव्हान देत शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतात. असाच धाडसी प्रयोग कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे बंधूंनी केला असून, यंदाच्या हंगामातील पहिली द्राक्षे त्यांनी बाजारात आणली आहेत. नंदकुमार ढवळे व विकास ढवळे यांनी उत्पादित केलेल्या द्राक्षांना प्रती चार किलो ५०१ रुपयांचा दर मिळवून त्यांनी बाजी मारली आहे. त्यांनी घेतलेल्या १० गुंठ्यांमध्ये सहा लाखांहून अधिकचे उत्पादन त्यांना मिळणार आहे.

जिल्ह्यातील नियमित द्राक्ष हंगामास नोव्हेंबरपासून सुरुवात होते. एप्रिलपर्यंत जिल्हाभरातील द्राक्षे संपूर्ण देशासह परदेशातही जात असतात. मात्र, नियमित छाटणीपेक्षा आगाप छाटणी घेऊन सगळ्यात अगोदर द्राक्षे बाजारात आणणे खूप जोखमीचे काम असते. औषधांसह पिकासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, योग्य व्यवस्थापन आणि फळाची काळजी घेत काेंगनोळी येथील ढवळे यांनी द्राक्षे बाजारात आणली आहेत. जिल्ह्यातील ही पहिलीच द्राक्षे आहेत. दक्षिण भारतातील बाजारपेठेत ही द्राक्षे जाणार आहेत.

जूनमध्ये छाटणी आणि नियोजन

ढवळे यांनी ३० जून रोजी फळछाटणी घेतली होती. त्यानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचा माल बाजारपेठेत जाण्यासाठी तयार झाला आहे. रविवारी बेळंकी येथील व्यापाऱ्याने हा द्राक्षमाल खरेदी केला असून, तो चेन्नई, हैदराबाद बाजारपेठेत जाणार आहे.

दहा गुठ्यांत सहा लाखांचे उत्पादन

५०१ रुपये प्रती चार किलो दर मिळालेल्या या द्राक्षबागेच्या प्लाॅटचे १० गुंठे क्षेत्र आहे. यातून ढवळे यांना सहा लाखांहून अधिकचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मध्येही त्यांनी याच प्लॉटमधून १० गुंठ्यांमध्ये पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.

शेतकऱ्यांच्या धाडसाला सलाम आणि दाद

वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना कोणतेही पीक घेणे आव्हानात्मक ठरत आहे. हेच आव्हान स्वीकारत ढवळे यांनी आगाप छाटणी तर घेतलीच शिवाय चांगले उत्पादन मिळवून दाखवले. ५०१ रुपयांचा दर मिळाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनीही त्यांचे अभिनंदन करत प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले.

दराचा विक्रम जिल्ह्यातच

गेल्याच आठवड्यात सांगाेला तालुक्यातील एका शेतकऱ्यानेही द्राक्षे बाजारात आणली. त्यांना ४५१ रुपयांचा दर मिळाला. मात्र, सांगली जिल्ह्यात सर्वांत प्रथम द्राक्षे आणि ५०१ रुपयांचा दर ढवळे यांना मिळाला आहे.

Web Title: Grapes got five hundred and one rate in sangli, The first grapes of the season entered the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली