शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

सरकार म्हणते तत्काळ काम करा, महापालिका म्हणते ताबडतोब थांबवा; सांगलीतील पाइपद्वारे गॅसपुरवठा रखडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:12 IST

गॅसटंचाईच्या काळात कामात खोडा

सांगली : गॅस पुरवठ्याबाबत राज्यात टंचाईची स्थिती असल्याने पाइपद्वारे गॅस योजनेची कामे युद्धस्तरावर राबविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. सांगलीत मात्र काम थांबविण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील घरोघरी गॅसपुरवठा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत.सध्याच्या युद्धजन्य स्थितीत सर्वत्र गॅस सिलिंडर पुरवठ्यावर ताण पडत असल्याच्या स्थितीत पाइपद्वारे गॅस पुरवठ्याचे महत्त्व वाढले आहे. राज्य शासनानेही पाइद्वारे गॅस पुरवठ्याची कामे गतीने करण्याचे आदेश दिले आहेत. नगरविकास विभागाने या संदर्भात शुक्रवारी आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे एलपीजी उपलब्धतेवर मर्यादा आल्या आहेत. या ऊर्जासंकटाला तोंड देण्यासाठी पाइपद्वारे गॅसजोडण्यांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याला अनुसरून कार्यवाही करावी.शासनाने असे आदेश दिलेले असताना सांगलीत मात्र महापालिकेने गॅसवाहिनीचे काम तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आदेश दिले की, गॅस कंपनीकडून महापालिकेशी समन्वय न ठेवता खोदकाम केले जात असल्याने जलवाहिन्या, ड्रेनेजवाहिन्या फुटत आहेत. त्यामुळे काम तातडीने थांंबवून झालेल्या कामाची चौकशी करावी. आदेशाचे उल्लंघन केल्यास गॅस कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. दरम्यान, शासनाने दिलेल्या आदेशात महापालिकेचे सर्व आक्षेप खोडून काढण्यात आल्याचे दिसत आहे.

२४ तासांत परवानगीचे शासनाचे आदेशशासनाने जारी केलेल्या आदेशांत म्हटले आहे की, शहरातील गॅस वितरणाबाबत महापालिका, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा व अन्य विभागांकडे परवानगीसाठीचे अर्ज प्रलंबित असतील, तर ते मंजूर झाल्याचे गृहीत धरावे. या संस्थांनी गॅस वितरणासाठी २४ तासांत परवानगी द्यावी. गॅस कंपन्यांना परवानगीसाठी शुल्क माफ करावे. खोदकाम केले असल्यास रस्ते पूर्ववत करण्यासाठी शुल्क घेऊ नये. गॅस कंपनीला शहरांत २४ तास काम करण्याची परवानगी असेल, शिवाय कोणत्याही हंगामात ते काम करू शकतील.

वाहतूक पोलिस, अग्निशमनच्या परवानगीची गरज नाहीशासनाने आदेशात असेही म्हटले आहे की, गॅस कंपन्यांना खोदकाम, पाइपलाइन टाकणे, रस्ता पूर्ववत करणे या कामांसाठी वाहतूक पोलिस किंवा अग्निशमन विभागाच्या परवानगी किंवा ना हरकत दाखल्याची गरज नाही. कंपनीने दररोजच्या कामाची यादी त्यांना माहितीसाठी द्यावी. हे आदेश ३० जूनपर्यंत अमलात राहतील.

महापालिका क्षेत्रात २८ हजार घरांना प्रतीक्षामहापालिका क्षेत्रात २९ हजार जोडण्यांपैकी १२०० कुटुंबांना गॅसपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे ही कुटुंबे सध्याच्या टंचाईकाळात निर्धास्त आहेत. ईश्वरपूरमध्ये ६००० जोडण्यांपैकी ३०० कुटुंबांना गॅसपुरवठा सुरू झाला आहे. आष्ट्यामध्ये १२०० जोडण्या दिल्या असल्या, तरी तेथे अद्याप प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Gas pipeline project in Sangli faces conflict between government, municipality.

Web Summary : Sangli's gas pipeline project is stalled as the municipality halts work despite government orders to expedite it. The municipality cites uncoordinated digging damaging infrastructure, while the government aims to ease gas shortages with rapid pipeline installations and waived fees.