शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनच्या सुरक्षेवर सरकारला जाब, वन्यप्राणी हल्ल्यांवर उच्च न्यायालयाची गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:04 IST

शाहूवाडी व शिराळा तालुक्यातील गावांत वन्यप्राण्यांचा वावर वाढला

वारणावती (जि. सांगली) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या बफर झोनमध्ये वाढलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांचे जीवन धोक्यात आले आहे. शाहूवाडी तालुक्यातील उखळू, उदागिरी, निनाई परळे, आंबा व शिराळा तालुक्यातील मणदूर या गावांमध्ये बिबटे, वाघ व गव्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचने गंभीर दखल घेत राज्य सरकारला जाब विचारला आहे. हरीश कांबळे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल क्र. ०८/२०२६) न्यायमूर्ती आर. जी. अवचट व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेची ‘तातडीची सुनावणी’ म्हणून नोंद घेऊन एका दिवसात सुनावणी घेतली.सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सरकारला नोटीस बजावली.न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, वन्यप्राणी आता केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित न राहता शहरी भागातही शिरकाव करत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, तसेच हल्ल्यात मृत्यू झालेल्या किंवा जखमी नागरिकांना वेळेवर व पुरेशी नुकसानभरपाई मिळते का याची विचारणाही खंडपीठाने केली. न्यायालयाने राज्य सरकारला ५ मार्च रोजीच्या पुढील सुनावणीस सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी कोणत्या ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.काय आहे प्रकरण?शाहूवाडी व शिराळा तालुक्यातील गावांत वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. ३० जानेवारी रोजी राजवीर पाटील (७) या चिमुकल्याचा हल्ल्यात मृत्यू झाला, तर स्वरांजली पाटील (वय ८) हिला तिच्या १२ वर्षीय भावाने बिबट्याच्या जबड्यातून वाचवले. ग्रामस्थांच्या जीवित सुरक्षेसाठीच ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Court demands action on Sahyadri tiger reserve buffer zone safety.

Web Summary : Bombay High Court addresses rising wildlife attacks near Sahyadri Tiger Reserve. Government is ordered to report on safety measures after fatal incidents involving leopards and gaur. Compensation for victims is also under scrutiny.