Sangli: कडेगाव येथे कुत्र्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू, खेळत असताना घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:34 IST2025-03-20T18:33:49+5:302025-03-20T18:34:12+5:30

कडेगाव : कडेगाव येथील माळीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात प्रांजली राहुल माळी (वय ६, रा. माळीनगर, कडेगाव) या बालिकेचा ...

Girl dies in dog attack in Kadegaon sangli | Sangli: कडेगाव येथे कुत्र्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू, खेळत असताना घडली घटना

Sangli: कडेगाव येथे कुत्र्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू, खेळत असताना घडली घटना

कडेगाव : कडेगाव येथील माळीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात प्रांजली राहुल माळी (वय ६, रा. माळीनगर, कडेगाव) या बालिकेचा मंगळवारी मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कडेगावातील माळीनगर येथे प्रांजली हिचे वडील राहुल माळी हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी (दि. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रांजली ही तिच्या मोठ्या बहिणीसह शेजारी असलेल्या मैत्रिणीच्या घरी खेळण्यासाठी निघाली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रांजली हिच्या मानेला व गळ्याला चावा घेतला. त्यामुळे प्रांजली ही जमिनीवर कोसळली. 

मुलीचा आरडाओरडा ऐकून शेतात काम करीत असलेले प्रांजली हिचे वडील राहुल हे धावत आले; परंतु तोपर्यंत प्रांजली ही गंभीर जखमी झाली होती. वडील राहुल व नातेवाइकांनी तिला उपचारासाठी तत्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालय, कऱ्हाड येथील कृष्णा, सह्याद्री येथे प्राथमिक उपचारानंतर सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथे उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. १८) दुपारी तिचा मृत्यू झाला.

कडेगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. त्याची नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतली असून, याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल. - डॉ. पवन म्हेत्रे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कडेगाव

Web Title: Girl dies in dog attack in Kadegaon sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.