शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सीमावासीयांचा टाहो: सरकारकडे मांडायची किती गाऱ्हाणी? दारी केव्हा खळखळणार पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 18:58 IST

पाण्याविना शेती पिकत नसल्याने शंभर एकरांचा शेतकरी दरवर्षी उसाच्या फडावर मजूर म्हणून जातो.

गजानन पाटीलदरीबडची : जत तालुक्यातील ६४ गावांतील जनतेने सरकारकडे पाण्याशिवाय कोणतीही विशेष मोठी मागणी केली नाही. याकडे मागील सरकारने काय केले, यावर ऊहापोह करण्याऐवजी सरकारने, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून तालुक्याला कोणत्याही योजनेतून पाणी देता येते, यावर गांभीर्याने विचार करावा. मग ती म्हैसाळची विस्तारित योजना असो वा तुबची-बबलेश्वर योजना, हे महत्त्वाचे नसून वंचित गावांना पाणी मिळणे हा महत्त्वाचा विषय आहे.तालुक्यातील ६४ गावे म्हैसाळ पाण्यापासून वंचित आहेत. निसर्गाबरोबरच राज्यकर्त्यांनी सापत्न वागणूक दिली आहे. पाण्याविना शेती पिकत नसल्याने शंभर एकरांचा शेतकरी दरवर्षी उसाच्या फडावर मजूर म्हणून जातो.वंचित गावातील पाणीप्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने कर्नाटक सरकार आपले वाटायला लागले आहे, अन्यथा ही गावे कर्नाटकात जाण्यासाठी एल्गार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. तातडीने राज्याकडे प्रस्तावित असणारी म्हैसाळ विस्तारित योजना व तुबची-बबलेश्वर योजना प्रत्यक्षात सुरू करण्याची गरज आहे.पाण्याच्या योजनेबाबत यापूर्वी कर्नाटक-महाराष्ट्र सरकार यांच्यात बोलणी झाली आहे. महाराष्ट्र शासनाने पाच टीएमसी पाणी कर्नाटकला द्यावे, त्या मोबदल्यात चार टीएमसी पाणी महाराष्ट्राला द्यावे लागणार आहे. चर्चा होवूनही पुढे काहीच पावले पडली नाहीत.

म्हैसाळ विस्तारित योजनेला सिंचन योजनांच्या अनुशेषातून २ हजार १०० कोटींचा निधी आणला आहे, असे सांगितले जात आहे. तो निधी कधी येणार माहिती नाही. त्या अगोदर शासनाने लोकसहभागातून म्हैसाळ मायथळ कॅनाॅलपासून व्हसपेठ तलावापर्यंत, शेड्याळ, कारानजगी डोणतील काम करण्यास परवानगी द्यावी. -तुकारामबाबा महाराज 

शासनाने म्हैसाळ विस्तार योजनेसाठी तत्काळ आर्थिक निधीची तरतूद करावी किंवा तुबची-बबलेश्वर योजनेसाठी आंतरराज्य करार करावा. यासाठी शासनाला ५ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिले आहे. पाणी संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेऊन जनजागृती करणार आहे. -अनिल शिंदे, उपाध्यक्ष, पाणी संघर्ष समिती

जत पूर्व भागातील ४२ वंचित गावांतील प्रमुख प्रश्न पाण्याचा आहे. कर्नाटक शासनाने मोफत तुबची-बबलेश्वर योजनेतून तीन वर्षांपासून पाणी सोडले. मात्र, सरकारने कोणतीही पाणी योजना न राबविल्याने आम्ही कर्नाटकात जायचा विचार करत आहोत. त्वरित पाणी देण्यासाठी हालचाल करावी, अशी आमची मागणी आहे. - मधू मुरगोंड, द्राक्ष बागायतदार उमदी.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकjat-acजाट