सांगलीत दिशा समितीच्या सभेतही गॅसटंचाई चर्चेच्या केंद्रस्थानी; सदाभाऊ खोत म्हणाले, आम्हीही ब्लॅकने सिलिंडर घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:51 IST2026-03-16T16:51:10+5:302026-03-16T16:51:47+5:30

घरगुती गॅसची कोठेही टंचाई भासू नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी

Gas shortage also at the center of discussion in the Disha Samiti meeting in Sangli; Sadabhau Khot said we also bought cylinders in black | सांगलीत दिशा समितीच्या सभेतही गॅसटंचाई चर्चेच्या केंद्रस्थानी; सदाभाऊ खोत म्हणाले, आम्हीही ब्लॅकने सिलिंडर घेतले

सांगलीत दिशा समितीच्या सभेतही गॅसटंचाई चर्चेच्या केंद्रस्थानी; सदाभाऊ खोत म्हणाले, आम्हीही ब्लॅकने सिलिंडर घेतले

सांगली : सांगलीत शनिवारी झालेल्या दिशा (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण) समितीच्या सभेतही गॅसचा कथित तुटवडा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. आमदार सदाभाऊ खोत यांनीही आम्ही सिलिंडर ब्लॅकने घेतला, अशी माहिती दिली. यानिमित्ताने जिल्ह्यातील गॅस टंचाईचा विषय प्रशासनाने प्राधान्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. जिल्ह्यात सध्या गॅससाठी लोकांची धावाधाव सुरू असल्याने सभेतही हा विषय प्राधान्याने चर्चेला आला. खासदार पाटील म्हणाले, घरगुती गॅसची कोठेही टंचाई भासू नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. जिल्ह्यात सिलिंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक उपाययोजना प्रशासनाने कराव्यात.

या चर्चेदरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांनी नागरिकांच्या धावपळीची माहिती दिली. ते म्हणाले, टंचाई नसली, तरी लोक धास्तावून सिलिंडरसाठी गर्दी करीत आहेत. आमच्या आश्रमशाळेतील सिलिंडर संपल्यावर तो मिळाला नाही, त्यामुळे आम्हाला काळ्या बाजारात खरेदी करावा लागला.

त्यावर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यात घरगुती गॅसची कोठेही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. सर्व गॅस कंपन्यांकडे पुरेसा साठा असून, शासकीय संस्था, शाळा, वसतिगृहांना प्राधान्याने दिला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : सांगली बैठक में गैस की कमी छाई; विधायक ने कालाबाजारी में सिलेंडर खरीदने की बात कबूली।

Web Summary : सांगली की दिशा समिति की बैठक में गैस की कमी की चिंता छाई रही। विधायक खोत ने कालाबाजारी में सिलेंडर खरीदने की बात कबूल की। अधिकारियों ने पर्याप्त गैस आपूर्ति का आश्वासन दिया, संस्थानों को प्राथमिकता। दहशत में खरीदारी से कमी महसूस होती है।

Web Title : Gas shortage dominates Sangli meeting; MLA admits buying black market cylinders.

Web Summary : Gas shortage concerns dominated Sangli's Disha committee meeting. MLA Khot admitted purchasing cylinders on the black market. Officials assured adequate gas supplies, prioritizing institutions. Panic buying fuels perceived scarcity.