शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीची प्रतिष्ठापना यंदा मंडळाच्या अध्यक्षांच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST

आरग येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सुरेखा नाईक, उपसरपंच विनोद बुरुड, ...

आरग येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सुरेखा नाईक, उपसरपंच विनोद बुरुड, बाबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

लिंगनूर : यंदाच्या गणेशोत्सवात रस्त्यावर मंडप उभा करता येणार नाही. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्याच्या घरातच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी लागेल. कोरोना व लॉकडाऊनमुळे पोलिसांनी तसे आदेश जारी केले आहेत.

आरग (ता. मिरज) येथे ग्रामीण पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत तशी माहिती दिली. निरीक्षक चंद्रकांत बेदरे, सरपंच सुरेखा नाईक, उपसरपंच विनोद बुरुड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सदस्य एस. आर. पाटील, सर्जेराव खटावे, संदीप नाईक, बाबासाहेब पाटील, ग्रामसेवक नागेश कोरे आदी उपस्थित होते. बेंदरे म्हणाले की, सार्वजनिक जागेत किंवा रस्त्यावर उत्सव साजरा करता येणार नाही. मंदिरातही प्रतिष्ठापनेला परवानगी नाही. मंडळाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या खासगी जागेत मंडप उभारता येईल. मंडळाची मूर्ती चार फुटांपेक्षा अधिक उंच असू नये. घरगुती उत्सवासाठीही दोन फुटांपेक्षा उंच मूर्ती घेऊ नये. स्वागताच्या व विसर्जनाच्या मिरवणुका काढता येणार नाहीत. वाद्येही वाजवता येणार नाहीत.

ते म्हणाले, कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या पैशांतून आरोग्य शिबिरे घ्यावीत किंवा सामाजिक उपक्रम राबवावेत. एक गाव, एक गणपती उपक्रम राबवावा. उत्सव साधेपणाने साजरा करावा.

चौकट

बेंदरे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे उत्सवात गर्दी करू नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास कोरोना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.