बलात्कारप्रकरणी सातारच्या युवकावर गुन्हा - : तरुणी सांगलीतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 19:23 IST2019-06-01T19:00:23+5:302019-06-01T19:23:45+5:30

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर कºहाड येथे बलात्कार केल्याप्रकरणी गणेश अशोक गुरव (रा. पारगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Gangrape on rape case: Saturn's gang | बलात्कारप्रकरणी सातारच्या युवकावर गुन्हा - : तरुणी सांगलीतील

बलात्कारप्रकरणी सातारच्या युवकावर गुन्हा - : तरुणी सांगलीतील

ठळक मुद्देसांगली शहर पोलिसांत तक्रार

सांगली : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर कºहाड येथे बलात्कार केल्याप्रकरणी गणेश अशोक गुरव (रा. पारगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरव याने पीडित तरुणीची अश्लील छायाचित्रेही व्हायरल करून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 

पीडित तरुणी १९ वर्षाची आहे. ती खणभाग परिसरात राहते. तिला संशयिताने लग्नाचे आमिष दाखविले होते. कºहाड येथील त्याच्या मित्राच्या घरी नेऊन त्याने पीडित तरुणीशी शरीरसंबंध केला होता. २००६ मध्ये गणेश याने वाढदिवसादिवशी त्याचा भाऊ उदय गुरव याच्या माधवनगर येथील घरामध्ये पीडित तरुणीची अश्लील छायाचित्रेही घेतली होती.

दरम्यान, पीडित तरुणीचा विवाह निश्चित झाल्याने संशयिताने तिच्या भावी पतीच्या मित्राला ही छायाचित्रे मोबाईलवर पाठविली होती. त्यानंतर पीडित तरुणीने शुक्रवारी बलात्कार व बदनामी केल्याची तक्रार सांगली शहर पोलिसांत दिली. याप्रकरणी बाललैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा व माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलमानुसार संशयित गणेश गुरव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्याला अटक केलेली नाही.

 

Web Title: Gangrape on rape case: Saturn's gang