शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पंचकल्याणमध्ये गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, संशयित कोल्हापूर, जयसिंगपूरच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 20:18 IST

शकुंतला पाटील या हात धुण्यासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेऊन संशयित चोरट्या महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरले होते. 

घनशाम नवाथे, सांगली दुधगाव (ता. मिरज) येथे पंचकल्याण महोत्सवात महिलेचे अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. महिला दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! संशयित लक्ष्मी बाळू सकट (वय २४, रा. राजेंद्रनगर, झोपडपट्टी, कोल्हापूर), दीपाली अशोक काळे (वय ४०, रा. संभाजीनगर, जयसिंगपूर), सोनू हरी काळे (वय ३५, रा. वाल्मीकी आवास, सांगली), शारदा बंटीनाथ हातळगे (वय ४, जयसिंगपूर) यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

दुधगाव (ता. मिरज) येथे दि. ८ मे रोजी पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलवाड (ता. मिरज) येथील शकुंतला शशिकांत पाटील या पूजेसाठी आल्या होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास जेवण विभागात जेवण करून शकुंतला पाटील या हात धुण्यासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेऊन संशयित चोरट्या महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरले. 

याबाबत पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ग्रामीण ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक चोरट्यांच्या मागावर होते. त्यांना चोरट्या महिलांची टोळी बुधगाव हायस्कूलजवळ दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून चोरीचे गंठण जप्त केले.

ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, सहायक फौजदार मेघराज रूपनर, अभिजीत पाटील, बंडू पवार, सचिन कोळी, मनोज नीळकंठ, हिंमत शेख, मनीषा कोरे यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिसtheftचोरी