आटपाडी तालुक्यातील बंधाऱ्यांसाठी ‘नियाेजन’मधून २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:41+5:302021-08-26T04:29:41+5:30

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी व लवटेवस्ती येथे जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीतून ...

Fund of Rs. 25 lakhs from 'Niyajan' for dams in Atpadi taluka | आटपाडी तालुक्यातील बंधाऱ्यांसाठी ‘नियाेजन’मधून २५ लाखांचा निधी

आटपाडी तालुक्यातील बंधाऱ्यांसाठी ‘नियाेजन’मधून २५ लाखांचा निधी

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी व लवटेवस्ती येथे जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीतून पंचवीस लाख रुपयांचे दोन बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, पंचायतीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, माजी उपसभापती रूपेश पाटील, जयवंतराव सरगर उपस्थित होते.

आटपाडी जिल्हा परिषद गटातील शेरेवाडी व लवटे वस्तीवरील नागरिकांची अनेक वर्षांपासून बंधारे उभारण्याची मागणी होती. अरुण बालटे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून विशेष प्रयत्न करत दोन्ही बंधाऱ्यांसाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दोन्ही बंधाऱ्यांमुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी अरुण बालटे यांच्या कामाचे कौतुक करत आटपाडी जिल्हा परिषद गटातील समस्य सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी विष्णू अर्जुन, सरपंच विठ्ठल बाड, गणपत मंडले, नवनाथ कदम, मारुती मगर, दिलीप बोराडे, चंद्रकांत बोराडे, प्रकाश बोराडे, मच्छिंद्र बोराडे, वैभव बोराडे, हणमंत कदम, सर्जेराव राक्षे, विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Fund of Rs. 25 lakhs from 'Niyajan' for dams in Atpadi taluka