शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

खुनासह दरोड्यातील फरारीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 4:57 PM

खुनासह दरोडा व मोक्काअंतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या व पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २५, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव असून त्याला एलसीबीच्या पथकाने काळमवाडी परिसरात शिताफीने अटक केली.

ठळक मुद्देखुनासह दरोड्यातील फरारीस अटकदरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात यश

सांगली : खुनासह दरोडा व मोक्काअंतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या व पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २५, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव असून त्याला एलसीबीच्या पथकाने काळमवाडी परिसरात शिताफीने अटक केली.याबाबत माहिती अशी, खुनासह दरोडा व मोक्काअंतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये व पोलिसांच्या तावडीतूनही पसार झालेल्या मुक्या पवारने तीन जिल्ह्यात गुन्हे केले आहेत. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पवारच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी खास पथक तयार केले होते.

त्यानुसार या पथकाने सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेत त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालविले होते. शुक्रवारी एलसीबीचे पथक इस्लामपूर, पेठनाका परिसरात असताना त्यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मुक्या पवार हा काळमवाडी परिसरात लपला आहे. त्यानंतर पथकाने तातडीने तेथे जाऊन सापळा रचत त्याला शिताफीने पकडले.मुक्या पवार हा अनेक गंभीर गुन्ह्यांतील सराईत व क्रूर गुन्हेगार आहे. १४ आॅगस्ट २०१७ मध्ये उदगाव (जि. कोल्हापूर) येथे मुक्याने साथीदारांसह सात लाखांचा दरोडा टाकताना, त्या घरातील अरुणा बाबूराव निकम यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता, तसेच बाबूराव निकम गंभीर जखमी झाले होते.

या गुन्ह्यातील त्याच्या सहभागामुळे त्याला अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना प्रकृती बिघडल्याने त्यास सीपीआर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना, १ आॅक्टोबर २०१७ रोजी पहाटे रखवालीतून तो पसार झाला होता.फरार असताना त्याने शिरसी (ता. शिराळा) येथे सुनंदा अशोक शिरसाठ यांच्या घरावर दरोडा टाकून एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. एलसीबीने यातील काही दरोडेखोरांना अटक करत माल हस्तगत केला होता. तसेच दि. १ एप्रिल २०१९ रोजी तुजारपूर येथील भास्कर तातोबा यादवी यांच्या मळ्यातील घरावर दरोडा टाकत ३ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यातही अन्य साथीदारांसह त्याचा सहभाग होता.लोणंद (जि. सातारा) येथील संतोष जयवंत खरात यांच्या घरावर खुनासह दरोडा टाकला होता. यात शांताबाई जयवंत खरात यांच्यावर वार करण्यात आला होता. त्यात त्या मृत झाल्या होत्या. या दरोड्यात २० हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्काअंर्तगत सांगली व सातारा जिल्ह्यात कारवाई झाली होती.पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, शरद माळी, युवराज पाटील, बिरोबा नरळे, उदय माळी, सागर लवटे, संदीप गुरव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली