Sangli Crime: महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करून पावणेपाच लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:53 IST2023-03-20T18:52:26+5:302023-03-20T18:53:14+5:30
पीडितेशी प्रेमसंबंध ठेवले व तिला शेजारीच भाड्याने खोली घेऊन दिली

Sangli Crime: महिलेशी प्रेमसंबंध निर्माण करून पावणेपाच लाखांची फसवणूक
सांगली : शहरातील संजयनगर परिसरात प्रेमसंबध निर्माण करून महिलेची चार लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पीडितेने अस्लम अहमद कोथळी, त्याची पत्नी, मुलगी, जावई आणि त्याच्या कार्यालयातील एका तरुणीविरुद्ध संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडितेची फसवणूक करत जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजयनगर परिसरात राहणाऱ्या संशयित कोथळी याने पीडितेशी प्रेमसंबंध ठेवले व तिला शेजारीच भाड्याने खोली घेऊन दिली. त्या ठिकाणी आणि अन्य एका उपनगरात तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले.
यानंतर त्याने पीडिता आणि तिच्या भावाला तुमच्या नावावर घर घेऊन देतो, असे सांगत त्यांच्याकडून १५ लाख रूपये घेतले. त्यापैकी चार लाख ६० हजार रूपये आणि पीडितेच्या बहिणीने घेेतलेल्या वाहन व्यवहारातील १५ हजार रूपये अद्यापही परत दिले नाहीत. यानंतर संशयिताची पत्नी, मुलगी आणि जावयाने पीडितेला संशयिताबरोबर असलेल्या संबंधाबाबत जाब विचारून शिवीगाळ केली. यानंतर संशयिताच्या कार्यालयातील मुलीनेही तिला शिवीगाळ केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.