शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

सांगलीत जादा परताव्याच्या आमिषाने चौघांना सव्वा कोटींचा गंडा

By शरद जाधव | Published: March 24, 2023 5:49 PM

कमी कालावधीत जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत

सांगली : सात महिन्यात दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने चौघांची १ कोटी २२ लाख ४२ हजार ३६० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चंद्रशेखर मार्तंड मोरे (रा. कुरूंदवाड जि. कोल्हापूर) यांनी मुजाहिद ऊर्फ राज अस्लम शेख (रा. सुभाषनगर ता. मिरज) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील विजयनगर परिसरातील स्वदेशी हाईटस् या इमारतीत पहिल्या मजल्यावर आदित्यराज कार्पोरेशन, डेल्फीनो ट्रेड, ब्रिझ पॉवर सोल्युशन प्रा. लि. आणि ट्रेड बुल या नावाने संशयिताने कार्यालये सुरू केली होती. फिर्यादी चंद्रशेखर मोरे यांनी आदित्यराज कंपनीत ऑगस्ट २०२१ ते दि. २३ मार्च २०२३ या कालावधीत २७ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली.फिर्यादी मोरे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना गुंतवलेल्या रकमेच्या मोबदल्यात ८ लाख रकमेचा परतावा तसेच आदित्यराज कार्पोरेशनचा १२ लाखांचा धनादेश शेख याने दिला होता. बॅंकेत धनादेश दिल्यावर तो न वटल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी मोरे यांच्या निदर्शनास आले.याप्रमाणेच आदित्यराज कार्पोरेशन कंपनीत प्रफुल्ल दादासाहेब पाटील (रा. एसटी कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यांनी ३३ लाख ३४ हजार ८६० रुपये, संदीप श्रीकांत कोकाटे (रा. खणभाग, सांगली) यांनी ६४ लाख ७ हजार ५०० रुपये, सचिन अरविंद पाटील (रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले) यांनी ५ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली होती. चौघांचीही १ कोटी २२ लाख ४२ हजार ३६० रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जादा परतावा आणि फसवणूककमी कालावधीत जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. शेअर मार्केट अथवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करून त्याद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखविण्यात येते. याप्रकारे फसवणूक झाल्यानंतर अनेक जण पोलिसात तक्रारही दाखल करत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस