शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:44 AM

Sanjay Raut : भाजपने नरेंद्र मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केलीय

Sanjay Raut on Narendra Modi : तेलंगणातल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा  उल्लेख केल्याने ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे माजी सदस्य सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासोबत भाजपने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

बुधवारी तेलंगणा इथल्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी पित्रोदा यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. मोदींनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंची नकली संतान असा केला. काँग्रेसला वाटतं की, पश्चिम भारतातले लोक अरबमधील लोकांसारखे दिसतात. मी जरा बाळासाहेब ठाकरेंचे नकली शिवसेनेचे पुत्र आहेत त्यांना विचारतो त्यांनी जरा बाळासाहेबांना आठवावं. मला बाळासाहेंबांच्या नकली मुलाला विचारायचं आहे, त्यांचे मेंटॉर वयोवृद्ध नेत्यालाही विचारायचंय. महाराष्ट्रातील लोकांना ही भाषा मंजूर आहे?, असं मोदींनी म्हटलं होतं. त्यावर आता संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय.

"ज्यांनी हल्ले करुन महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही याच मातीत गाडलं आहे. महाराष्ट्र संघर्ष करुन मिळवलेला आहे. एवढं त्यांना मिरच्या झोंबायचे कारण काय? मग मोदींच्या बाजूला औरंगजेबाचे फोटो लावा. तुम्ही त्याच वृत्तीचे आहात," असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.

"जर कोणी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे नकली पुत्र म्हणत असेल तर हा महाराष्ट्राचा आणि शिवसेनेचा अपमान आहे. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे हे देवतेसमान आई वडील होते. सगळा महाराष्ट्र त्यांना पूजतो. मोदी हे विसरले आहेत वाटतं. बाळासाहेब ठाकरेंचा कोणी अपमान केला तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुम्ही तु्म्हाला असलेल्या खऱ्या पुत्राविषयी बोला. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्याबाबतीत अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. बाळासाहेब आणि मीनाताईंना तुम्ही नकली म्हणता. ही तुमची हिम्मत. म्हणून आम्ही म्हणतो की तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मोदींवर आई वडिलांचे संस्कार नाहीत - उद्धव ठाकरे

"तेलंगणाच्या सभेत बोलताना त्यांनी माझा उल्लेख ‘बाळासाहेबांचा नकली पूत्र’ असा केला. मोदीजी मी नकली असेल तर तुम्ही बेअकली आहात. हा माझा अपमान नाही. हा माझ्या वडिलांचा म्हणजेच बाळासाहेबांचा आणि माझ्या आईचा अपमान आहे. मोदींवर कदाचित आईवडीलांचे संस्कार झाले नसतील. पण माझ्यावर झाले आहेत. मी सुसंस्कृत घरातला आहे," असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर येथे बोलताना दिलं.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे