Join us  

SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:05 AM

SBI Share Target Price : भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या शेअरची किंमत पुढील वर्षभरात १००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. स्टेट बँकेचे तिमाही निकाल आश्चर्यचकित करणारे ठरले आहेत.

SBI Share Target Price : भारतातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या शेअरची किंमत पुढील वर्षभरात १००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. स्टेट बँकेचे तिमाही निकाल आश्चर्यचकित करणारे ठरले आहेत. एसबीआयच्या निकालानंतर चेअरमन दिनेश खारा यांनी सीएनबीसी टीव्ही - १८ ला मुलाखत दिली. यापुढेही लोन ग्रोथ १६ टक्क्यांच्या पातळीवर राहण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी मुलाखतीत म्हटलं. एसएमई, रिटेल, अॅग्री आणि कॉर्पोरेट सेगमेंटमधून चांगल्या वाढीची अपेक्षा आहे. बँक यावर्षी टियर-१ भांडवल उभारणार आहे. 

शेअर प्राईज हिस्ट्री 

कामकाजाच्या सुरुवातीच्या सत्रात स्टेट बँकेच्या शेअरमध्ये थोडी तेजी दिसून आली होती. गेल्या महिनाभरात ५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत त्यात ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा आतापर्यंत त्यात सुमारे २८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. 

काय म्हणाले एक्सपर्ट्स 

एसबीआयच्या शेअर्ससाठी ५१ अॅनालिस्टपैकी ४१ अॅनालिस्टनं शेअरवर 'बाय' रेटिंग कायम ठेवलं आहे, तर सात अॅनालिस्टनं शेअरवर 'होल्ड' रेटिंग कायम ठेवलं आहे. तीन अॅनिलिस्ट्सनं अजूनही "सेल" रेटिंग कायम ठेवलंय. 

ब्रोकरेज फर्म नोमुराने एसबीआयची टार्गेट प्राईज ८२५ रुपयांवरून १००० रुपयांपर्यंत वाढवलं आहे. एसबीआयनं २०२५ आणि २०२६ या आर्थिक वर्षात प्रति शेअर उत्पन्नाचा अंदाज १५ टक्क्यांनी वाढवला आहे. आणखी एक ब्रोकरेज फर्म हाईटॉन्गनं एसबीआयवर १००० रुपयांची टार्गेट प्राइस ठेवली आहे. एसबीआयच्या मालमत्तेची गुणवत्ता, मार्जिन आणि व्यवसायाचा वेग पुढील काळात आणखी सुधारेल, अशी अपेक्षाही यांनी व्यक्त केली. 

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनेही एसबीआयवरील आपली टार्गेट प्राइस ९५० रुपयांपर्यंत वाढवली आहे आणि आपलं 'बाय' रेटिंग कायम ठेवलंय. जेफरीजनेही शेअरवरील 'बाय' रेटिंग कायम ठेवलं असून टार्गेट प्राईज ८१० रुपयांवरून ९८० रुपये केली आहे. इन्क्रेडने एसबीआयवर १,००० रुपयांची टार्गेट प्राइस ठेवली आहे.  

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाशेअर बाजार