शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 11:24 PM

केंद्र, राज्य शासनाकडून जनतेची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. जे भाजपात गेले, ते घाबरून गेलेले आहेत. पक्षावर निष्ठा असणारा, खा. शरद पवारांवर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता पक्षासमवेत आहे. दीड-दोन महिन्यात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना बोलावून पक्षाचे शिबिर घेऊ, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आटपाडी येथील सभेत बोलताना व्यक्त केला.टेंभू योजनेच्या निधीबद्दल विधानसभेत आवाज उठविण्याबरोबरच कृष्णा व कोयना नद्यांतून वाहून जाणारे पुराचे पाणी तातडीने उचलून आटपाडीसह दुष्काळी तालुक्यांना द्यावे, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील कल्लेश्वर मंदिर हॉलमध्ये आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवक, महिला, विद्यार्थी यांसह विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आ. पाटील यांच्याहस्ते निवडीची पत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, महिला जिल्हाध्यक्षा सौ. छाया पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख, विद्यार्थी जिल्हाध्यक्षा स्वप्नील जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आ. पाटील म्हणाले, राज्य व केंद्र शासन रोज नवनव्या घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे. हे शासन बेजबाबदार आहे. काही तरी होईल, अशी आशा बाळगणाऱ्या राज्यातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचे आरक्षण देणाऱ्या सरकारला अजून मुहूर्त मिळालेला नाही. मराठा व मुस्लिम समाजाचे आरक्षणही प्रलंबित आहे. नोटाबंदीने आपल्या परिसरातील डाळिंबासह शेतीमालाचे दर कोसळले असून, जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे.यावेळी सौ. छाया पाटील, बाबासाहेब मुळीक, भरत देशमुख, स्वप्नील जाधव, नूतन महिला तालुकाध्यक्षा सौ. अश्विनी गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष निखिल दिवटे, विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष सागर काळे, अ‍ॅड. अजित वसेकर सादिक खाटिक यांचीही भाषणे झाली.तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी दुष्काळी भागाचे प्रश्न विधानसभेत मांडून आम्हास न्याय द्या, ताकद द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी माजी सभापती जयमाला देशमुख, पं. स. सदस्या सौ. उषाताई कुठे, किसन जानकर, कल्लाप्पा कुठे, भाऊसाहेब देशमुख, रणजित देशमुख, रोहित देशमुख, शरद नांदुगडे, जालिंदर कात्रे, रमेश मोरे, अनिल ऐवळे, माणिक पांढरे, संपतराव पाटील, अविनाश बनसोडे, साहेब कदम, ईश्वरा ऐवळे, रियाज शेख, राघो रणदिवे, नितीन माळी उपस्थित होते.त्यांना विसरणार नाही विलासराव शिंदे म्हणाले, ज्यांना आम्ही मागेल ते-ते दिले, तीच मंडळी ऐन जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीत आमचा पक्ष सोडून गेली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाची लाज राखण्याचे काम केले आहे. आम्ही आपणास कधीही विसरणार नाही.