शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

चार रेशन दुकाने निलंबित, दहा रद्द

By admin | Updated: February 4, 2015 00:01 IST

पुरवठा विभागाची कारवाई : तपासणीमध्ये आढळले दोषी

सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा पुरवठा विभागाने राबविलेल्या तपासणी मोहिमेत गंभीर दोष आढळलेली चार स्वस्त धान्य दुकाने निलंबित करण्यात आली, तर दहाजणांचे परवाने रद्द करण्यात आल्याचे आज (मंगळवारी) स्पष्ट झाले. यामुळे रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हा पुरवठा विभाग व अन्यधान्य विभागातील पुरवठा निरीक्षकांकडून तीन महिन्यांपासून दुकानांची तपासणी केली. यामध्ये दुकान नियमाप्रमाणे उघडे नसणे, धान्याचा अनियमित पुरवठा, हिशेबाचा तपशील नसणे, पावत्यांमध्ये खाडाखोड करणे, ग्राहकांची बोगस नावे घुसडणे, उपलब्ध धान्याचा साठा व विक्रीचा साठा यामध्ये तफावत आढळणे, सुरक्षा सप्ताहामध्ये दुकान बंद असणे आदी प्रकारांमध्ये दोषी आढळलेल्या चार दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर दहा दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. परवाने निलंबित करण्यात आलेल्या दुकानांमध्ये विश्वनाथ ताह्मणकर (गवळी गल्ली, सांगली), एम. आर. खाडे (शंभर फुटी रस्ता, सांगली), उध्दव बाळकृष्ण ताटे (जुना बुधगाव रोड, सांगली) व गावभागातील एका दुकानाचा समावेश आहे. त्याचबरोबर दहा दुकानांचे परवाने रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. किरकोळ दोषी आढळलेल्या ७७ दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८ हजार ५०० रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर ४१ हजार १०६ रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)


रॉकेलमध्ये चार टक्के कपात
फेब्रुवारी महिन्याच्या रॉकेल पुरवठ्यामध्ये चार टक्के कपात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली. याचे वितरण झाले असून, मार्च महिन्यापर्यंतचे रॉकेल वाटप जाहीर करण्यात आले आहे. मागणीच्या तुलनेत २१ ते २५ टक्के रॉकेल पुरवठा करण्यात आला आहे. मागणीच्या तुलनेत पुढील प्रमाणात टक्क्यामध्ये रॉकेल पुरवठा करण्यात आला आहे. सांगली २० टक्के , मिरज २१ टक्के , कवठेमहांकाळ २३ टक्के , जत २२ टक्के , तासगाव २० टक्के, खानापूर २२ टक्के, आटपाडी २० टक्के, वाळवा २२ टक्के, शिराळा २२ टक्के, पलूस २५ टक्के, कडेगाव २१ टक्के .

दुकानांची तपासणी सुरूच राहणार : गलांडे
स्वस्त धान्य दुकानांची तपासणी यापुढेही सुरूच राहणार असून, कारवाईची प्रक्रिया ही नियमित बाबीमधील आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली. ज्या दुकानांवर कारवाई झालेली आहे, त्यांना विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याचा अधिकार आहे.