शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी टापूत साकारतेय रसायनविरहीत साखर निर्मिती, अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:04 PM

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्यातील आळसंद-खंबाळे (भा.) येथे विराज केन्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो या नावाने रसायनविरहीत साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार करण्यात आला असल्याचे संस्थापक माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देदेशातील पहिला प्रकल्प अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर; पाच कंपन्यांशीसाखर विक्रीचाही करार जागतिक बाजारपेठेत रसायनविरहीत पदार्थांना मागणी

दिलीप मोहिते विटा : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्यातील आळसंद-खंबाळे (भा.) येथे विराज केन्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो या नावाने रसायनविरहीत साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार करण्यात आला असल्याचे संस्थापक माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी सांगितले.

साखरेपासून उपपदार्थांची निर्मिती सर्वच कारखाने करत असतात. परंतु, या पारंपरिक साखर कारखानदारीला छेद देत अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करीत विराज केन्सने रसायनविरहीत साखर निर्मितीचा जॅग्री शुगर उत्पादनाचा देशातील पहिला प्रकल्प आळसंद-खंबाळे येथील सुमारे १९ एकर माळरानावर उभा करण्यास सुरुवात केली आहे. तो आता अंतिम टप्प्यात आहे.

यासाठी पहिल्या टप्प्यात ७५ कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. उत्पादित रसायनविरहीत साखर परदेशात निर्यात होणार असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार केला आहे. प्रतिदिन १२५० टन ऊस गाळप क्षमता असलेला हा प्रकल्प शंभर टक्के स्वयंचलित आहे.

सध्या जागतिक बाजारपेठेत रसायनविरहीत साखर, गूळ, गुळाची पावडर, खांडसरी साखर या पदार्थांना सर्वाधिक मागणी असल्याने या पदार्थांच्या निर्मितीलाच विराज केन्स प्राधान्य देणार आहे.

 

ताकारी, टेंभू व आरफळ या जलसिंचन योजनांमुळे दुष्काळी खानापूर, तासगाव, कडेगाव, आटपाडी या तालुक्यात उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. येथील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता रसायनविरहीत साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प उभा राहत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चाचणी गळीत हंगाम घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.- अ‍ॅड. सदाशिवराव पाटील,माजी आमदार, विटा

विराज केन्स हा खासगी कारखाना असला तरी सहकार कायद्याच्या नियमाप्रमाणे शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात येईल. एफआरपीप्रमाणे ऊसदर देण्याबरोबरच तोडणी झालेला ऊस ४८ तासाच्या आत गाळप करणार आहोत. शेतकऱ्यांना त्यांच्याउसाचे वजन, साखर उतारा यासह अन्य माहिती मोबाईल संदेशाव्दारे देण्यात येणार आहे.- विशाल पाटील,कार्यकारी संचालक,विराज केन्स

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने