माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश सांगलीत, दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 15:30 IST2018-08-23T15:29:39+5:302018-08-23T15:30:47+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी सांगलीत दाखल झाला. आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात तो ठेवण्यात आला आहे. दर्शनासाठी येथे गर्दी झाली आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश सांगलीत, दर्शनासाठी गर्दी
सांगली : भाजपचे ज्येष्ठ नेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश गुरुवारी दुपारी सांगलीत दाखल झाला. आ. सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात तो ठेवण्यात आला आहे. दर्शनासाठी येथे गर्दी झाली आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी हरिपूर येथील कृष्णा-वारणा नदीच्या संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार असून यावेळी भाजपचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
वाजपेयींच्या अस्थिचे महाराष्ट्रात केवळ आठ ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. सांगलीला या आठ ठिकाणांमध्ये स्थान मिळाले आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी अस्थींचा कलश मुंबईतून आणला. गुरुवारी दुपारी ते दाखल झाले.
यावेळी महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, युवराज बावड़ेकर उपस्थित होते. टलजींवर प्रेम करणारे नागरिक, भाजपसह सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांंनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अस्थिकलश हरिपूर येथील कृष्णा-वारणा संगमावर विसर्जनासाठी नेण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक ठिकठिकाणी अस्थिकलशावर फुले वाहून श्रद्धांजली अर्पण करू शकतील.