सांगली : अनेक धक्कादायक निकाल नोंदवित सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागला. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले असून, आघाडी किंवा युतीशिवाय सत्ता स्थापना शक्य नाही. पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांना संमिश्र यश मिळाल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी सर्वाधिक ५० उमेदवार भाजपने उभे केले होते. स्पष्ट बहुमतांसह सत्तेचा दाव अनेक पक्षनेत्यांनी केला होता. मात्र, तो फोल ठरल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. अवघ्या २० जागांचा पल्लाही कोणत्याही पक्षाला गाठता आला नाही. १८ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला १६ जागा मिळाल्या आहेत.काँग्रेसने पलूस तालुक्यात आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व ८ जागा आणि पंचायत समितीच्या सात जागा जिंकल्या आहेत. खानापूर तालुक्यात शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी आपली मजबूत पकड दाखवून देताना विरोधकांना एकही जागा मिळू दिली नाही. जतमध्येही आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेच्या नऊपैकी आठ जागा जिंकत विरोधकांना धोबीपछाड दिला.
सत्तेसाठी जिल्हा परिषदेतही महापालिका पॅटर्न निर्माण झाला आहे. युती आणि आघाडी या दोहोंना अगदीच काठावरचे बहुमत आहे. एकूण जागांची संख्या ६१ आहे. बहुमतांसाठी किमान ३१ सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपने मित्रपक्षांना सोबत घेतले तरी त्यांचे संख्याबळ ३१ पर्यंत जाते. आघाडीतील पक्षांचे एकत्रित संख्याबळ ३० आहे. काठावरच्या बहुमतांमुळे सत्तेसाठी संघर्ष होणार हे स्पष्ट आहे.गेल्या पंचवार्षिकमध्ये २६ सदस्यांसह बहुमत सहज गाठलेल्या भाजपला यावेळी मात्र झगडावे लागणार आहे. दरम्यान, अनेक दिग्गजांना निवडणुकीत हार पत्करावी लागली आहे. यामध्ये हर्षदा महाडिक, जयश्री पाटील, अनिल आमटवणे आदींचा समावेश आहे. निवडणुकीत मतदारांनी क्रॉस व्होटिंग करत जिल्हा परिषदेला एक आणि पंचायत समितीला दुसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद गटांचे अंतिम बलाबल असे
- राष्ट्रवादी (शरद पवार) - १८
- काँग्रेस - ११
- भाजप - १६
- राष्ट्रवादी (अजित पवार) - ६
- शिंदेसेना - ७
- उद्धवसेना - १
- जनसुराज्य - १
- रयत क्रांती पक्ष १
पंचायत समितीतील तालुकानिहाय बलाबल असेमिरज : भाजप १०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३, काँग्रेस ३ व शिंदेसेना २खानापूर : शिंदेसेना ८शिराळा : राष्ट्रवादी ६, भाजप २वाळवा : राष्ट्रवादी (शरद पवार) १४, भाजप युती ८कडेगाव : काँग्रेस ७, भाजप १पलूस : काँग्रेस ६, भाजप १,तासगाव : राष्ट्रवादी (अजित पवार) ८, राष्ट्रवादी (शरद पवार) ३, भाजप १कवठेमहांकाळ : राष्ट्रवादी (अजित पवार) ३, राष्ट्रवादी (शरद पवार) ५आटपाडी : भाजप ३, शिंदेसेना ५जत : भाजप १२, काँग्रेस ४, राष्ट्रवादी (अजित पवार) २
तालुकानिहाय जिल्हा परिषद गटातील विजयी उमेदवार असेआटपाडीगट विजयी उमेदवार - पक्षदिघंची - पृथ्वीराज पाटील - शिंदेसेनाकरगणी - विनायक मासाळ - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)निंबवडे - माधवी पडळकर - भाजपजतजाडरबोबलाद - सावित्री रवी - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)उमदी - यलगोंडा तोरणे - भाजपसंख - कविता पाटील - भाजपदरीबडची - सरदार पाटील - भाजपमुचंडी - रमेश देवर्षी - भाजपबनाळी - सुनील पवार - भाजपशेगाव - डॉ. शिवाजी खिलारे - भाजपडफळापूर - स्वप्नाली मासाळ - भाजपबिळूर - शिल्पा जीवनावर - भाजपखानापूरनागेवाडी - डॉ. शीतल बाबर - शिंदेसेनालेंगरे - मनीषा बागल - शिंदेसेनाकरंजे - सई शिंदे - शिंदेसेनाभाळवणी - हिम्मत जाधव -शिंदेसेनातडसर - वैशाली मुळीक -काँग्रेसकडेगावकडेपूर - विद्या कुंभार - काँग्रेसवांगी - प्रियांका महाडिक काँग्रेसदेवराष्ट्रे - आशा डावरे काँग्रेसतासगावमांजर्डे - मोहन पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)सावळज - विजय धेंडे -राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)विसापूर - अर्जुन पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)येळावी - अमित पाटील - काँग्रेसचिंचणी - अविराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)मणेराजुरी - शशिकांत जमदाडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)कवठेमहांकाळढालगाव - विकास हाक्के राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)कुची - दादासाहेब कोळेकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)देशिंग - सुजाता पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)रांजणी - संजय बनसोडे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पलूसकुंडल - ऋषीकेश लाड - काँग्रेसदुधोंडी- वर्षा जाधव - काँग्रेसअंकलखोप - सुदीप गडदे -काँग्रेसभिलवडी - प्रतीक पाटील -काँग्रेसवाळवारेठरे हरणाक्ष - प्रतिमा मोरे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)बोरगाव - कांता वाटेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)कासेगाव - संगीता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)वाटेगाव -संध्या पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पेठ - मंदा माळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)वाळवा - संताजी मेटकरी शिंदेसेनाकामेरी - जयराज पाटील भाजपचिकुर्डे - अभिजित पाटील उद्धवसेनाबावची - धैर्यशील थोरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)बागणी - मोहिनी खोत रयत क्रांती पक्षयेलूर - देविका राजेघोरपडे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)शिराळापणुंब्रे तर्फ वारुण - शीला मोहिते - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)वाकुर्डे बुद्रुक -राजेश्वरी नाईक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)कोकरूड - साईतेजस्वी देशमुख जनसुराज्यमांगले - विराज नाईक - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)मिरजभोसे - आशिष जाधव भाजपएरंडोली - स्नेहल मोरे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)आरग - शोभा खोत भाजपबेडग - अस्मिता होनमोरे भ ाजपमालगाव - दीपाली कांबळे भाजपकवलापूर - मंजुश्री कांबळे भाजपबुधगाव - पूजा एडके काँग्रेसकसबे डिग्रज - प्रशांत अवधूत काँग्रेसकवठेपिरान - मीना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)समडोळी - अरविंद तांबवेकर भाजपम्हैसाळ - वर्षा कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
Web Summary : Sangli ZP election resulted in a hung council. NCP emerged as the largest party with 18 seats, followed by BJP with 16. Alliances are now crucial for forming the government. Congress dominates Palus, Shinde Sena in Khanapur, and BJP in Jat.
Web Summary : सांगली ज़ेडपी चुनाव में त्रिशंकु परिषद बनी। एनसीपी 18 सीटों के साथ सबसे बड़ी पार्टी बनी, जिसके बाद बीजेपी को 16 सीटें मिलीं। सरकार बनाने के लिए अब गठबंधन महत्वपूर्ण हैं। पलूस में कांग्रेस, खानापुर में शिंदे सेना और जत में बीजेपी का दबदबा।