शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

दहा टन युरियावर पाच टन मिश्र खताची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

सांगली : होलसेल रासायनिक खत विक्रेत्याला दहा टन युरिया पाहिजे असेल तर पाच टन मिश्र खते त्यांच्या माथी मारले ...

सांगली : होलसेल रासायनिक खत विक्रेत्याला दहा टन युरिया पाहिजे असेल तर पाच टन मिश्र खते त्यांच्या माथी मारले जात आहे. रासायनिक खत कंपन्यांच्या या भूमिकेमुळे खत विक्रेत्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकरी युरियाबरोबर मिश्र खते घेण्यास तयार नसल्यामुळे ते खत शिल्लक राहत आहे. मिश्र खतामध्ये लाखो रुपये होलसेल विक्रेत्यांचे अडकून पडत आहेत.

सध्या ऊस, मका पिकासाठी युरियाची गरज आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात रब्बी पेरणी सुरू झाली आहे. या ठिकाणीही युरियाची मागणी वाढली आहे. युरियाची मागणी वाढताच रासायनिक खत कंपन्याकडून युरियाचा पुरवठा होत आहे. पण, युरियाबरोबरच होलसेल विक्रेत्यासच मिश्र खतांची सक्ती केली जात आहे. दहा टन युरियासाठी पाच टन मिश्र खताची सक्ती आहे. काही किलो ते दोन किलोच्या पिशवीतील महागडी ड्रीपची खतेही आहेत. या खताचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग नाही. यामुळे शेतकरी मिश्र खते खेरिदी करत नाहीत. यामुळे होलसेल विक्रेत्याकडे मिश्र खते तशीच शिल्लक राहात आहेत. काही होलसेल विक्रेते स्वत:चा तोटा कमी करण्यासाठी युरिया घेणार असाल तर मिश्र खते तुम्हाला घ्यावीच लागतील, अशी सक्ती करत आहेत. खत कंपन्या आणि होलसेल विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराकडे कृषी विभागाचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

चौकट

खताची लिकिंग झाल्यास कारवाई : विनायक पवार

शेतकऱ्यांची गरज नसेल तर त्यांच्यावर अन्य कोणत्याही रासायनिक खताची विक्रेत्याला सक्ती करता येणार नाही. याबाबत विक्रेते, खत कंपन्या युरियावर अन्य खताची सक्तीने विक्री करत असल्यास कृषी विभागाकडे लेखी तक्रार करावी. आम्ही संबंधितांवर तत्काळ कारवाई करू, असा इशारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी दिला आहे.

चौकट

युरियाबरोबर मिश्र खताची सक्ती

रासायनिक खत कंपन्या युरियाबरोबर मिश्र खताची सक्ती करत आहेत. यामुळे होलसेल विक्रेते युरियाची खरेदी करत नाहीत. यामुळे जिल्ह्यात सध्या अनेक दुकानदाराकडे युरिया नाही. सध्या जो काही युरिया दिसत आहे, तो पॉसमशीनवरच दिसत आहे. यामुळे युरियाबरोबर मिश्र खताची लिकिंग करणाऱ्या कंपन्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी केली.