शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

साखरेचा उतारा वाढविण्यावर भर द्यावा -पी. आर. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:12 IST

इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी १ लाख २६ हजार मेट्रिक टन उसाचे जादा गाळप केले आहे

ठळक मुद्दे‘राजारामबापू’च्या वाटेगाव-सुरुल शाखेच्या गळीत हंगामाची सांगता; गतवर्षीपेक्षा १ लाख २६ हजार टन जादा गाळप

इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरूल युनिटमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी १ लाख २६ हजार मेट्रिक टन उसाचे जादा गाळप केले आहे. आमदार जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पुढच्यावर्षी आपण सर्वांनी या युनिटमध्ये ऊस गाळपात सातत्य ठेवताना साखर उतारा वाढविण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा राजारामबापू सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केली.राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरूल शाखेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. प्रारंभी कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामरावकाका पाटील यांच्याहस्ते सत्यनारायण पूजा करून, हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान केलेल्या तोडणी मजूर, मुकादम, कंत्राटदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कासेगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पाटील, ‘सोमेश्वर’चे माजी संचालक शंकरराव पाटील यांच्याहस्ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन केले.पी. आर. पाटील म्हणाले, आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असून, यावर्षी ५ लाख ३२ हजार ५३० टन उसाचे गाळप केले आहे.शामरावकाका पाटील म्हणाले, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांची दूरदृष्टी व अथक् परिश्रमातून वाटेगाव-सुरूल शाखा उभी राहिली आहे. या शाखेने सातत्याने सहकारी साखर कारखानदारीत आपले वेगळेपण जपलेले आहे. भविष्यातही या शाखेची यशस्वी घोडदौड कायम राहील.यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनिअर संताजी चव्हाण, चीफ केमिस्ट संभाजी सावंत, शेती अधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह कंत्राटदार सुजित पाटील, संदीप पाटील, के. डी. शेळके,अशोक पाटील, तानाजी पाटील, शंकर पाटील, विश्वनाथ लाहीगडे आदींचा सत्कार करण्यात आला.संचालक जे. वाय. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक आनंदराव पाटील यांनी आभार मानले. या समारंभास कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक दिलीपराव पाटील, दादासाहेब मोरे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.सरासरी साखर उतारा १२.६० टक्केपी. आर. पाटील पुढे म्हणाले, आपण वाटेगाव-सुरूल शाखेत यावर्षी ५ लाख ३२ हजार ५३० टन उसाचे गाळप करून ६ लाख ७१ हजार २०० क्विंटल साखर उत्पादन घेतलेले आहे. यावर्षी १२.६० इतका सरासरी साखर उतारा मिळाला आहे. हा साखर उतारा वाढविण्यावर आपण भर द्यायला हवा. आपण यावर्षी या युनिटच्या सहविद्युत प्रकल्पातून २ कोटी १० लाख १९ हजार युनिट वीज महावितरण कंपनीस निर्यात केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ४१ लाख युनिट वीज जादा निर्यात केली आहे.