शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

सांगलीत भारतातील पहिल्या फिरत्या समवशरणास प्रारंभ : षोडशकरण व दशलक्षण पर्वाचा विशेष कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:04 PM

चातुर्मासामध्ये षोडशकरण व दशलक्षण पर्वाच्या विशेष कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ झाला. नेमिनाथनगरमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली.

ठळक मुद्देसंयम स्वर्ण वर्षायोगनिमित्त आयोजन, श्रावक-श्राविकांचा मोठा सहभाग

सांगली : चातुर्मासामध्ये षोडशकरण व दशलक्षण पर्वाच्या विशेष कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ झाला. नेमिनाथनगरमध्ये उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. यानिमित्त उभारण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण व भारतातील पहिल्याच फिरत्या समवशरणामध्ये तीर्थंकर भगवंतांची पूजा सुरू झाली.

दिगंबर जैनाचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज, प्रबोधसागरजी महाराज, वृषभसागरजी महाराज, अभिनंदनसागरजी महाराज व सुपार्श्वसागरजी महाराज यांचा यावर्षीचा संयम स्वर्ण वर्षायोग सध्या सुरू आहे. या मंगलमय पुण्यकाळातील चातुर्मासातील षोडशकरण व दशलक्षण पर्वाचा हा विशेष कार्यक्रम आहे सकाळी सात वाजता सुहास पाटील (गोमटेश) यांच्याहस्ते ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष, माजी महापौर सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

२७ फूट उंचीच्या भव्य फिरत्या, मनमोहक समवशरणाची रचना या कार्यक्रमाचे आकर्षण आहे. नियमसागरजी महाराजांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली ही रचना करण्यात आली आहे. यामध्ये साडेपाच फूट उंचीचे तीर्थंकर भगवंतांच्या चार सुबक मूर्ती बसविण्यात आल्या आहेत.

या समवशरणामध्ये सहा विमानांची विशेष रचना करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी विमानातून भगवंतांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या कार्यक्रमासह सांगलीसह परिसरातील श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.आज पुण्यतिथी कार्यक्रमषोडशकरण पर्वातील प्रथम भावना ‘दर्शनविशुध्दी भावना’ यांची पूजा करण्यात आली. पूजेचा इंद्र-इंद्रायणीचा मान संदीप आवटी यांना मिळाला. दुपारी झालेल्या प्रवचनात नियमसागरजी महाराज यांनी दर्शनविशुध्दी भावनेचे महत्त्व सांगितले. मंगळवारी ‘विनयसंपन्नता भावना’ यांची पूजा तसेच प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीpoojaपूजा