कवठेमहांकाळमध्ये होंडा मोटारसायकलच्या शोरूमसह 4 दुकानांना आग, लाखोंचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 17:37 IST2024-01-28T17:34:26+5:302024-01-28T17:37:41+5:30
महेश देसाई कवठेमहांकाळ शहरात नवीन बसस्थानकच्या समोर असलेल्या होंडा मोटारसायकलच्या शोरूम व बेकरीसह तीन ते चार दुकानांना आग लागून ...

कवठेमहांकाळमध्ये होंडा मोटारसायकलच्या शोरूमसह 4 दुकानांना आग, लाखोंचं नुकसान
महेश देसाई
कवठेमहांकाळ शहरात नवीन बसस्थानकच्या समोर असलेल्या होंडा मोटारसायकलच्या शोरूम व बेकरीसह तीन ते चार दुकानांना आग लागून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी भरदुपारी घडली. नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.
याबाबत माहिती अशी की शहरात नवीन बसस्थानक येथे समोर एका लाईनेने होंडा कंपनीचे मोटारसायकल शोरूम, महालक्ष्मी बेकरी तसेच मोबाईल शॉपी व हरमन चहा दुकान, सलून दुकान अशा चार ते पाच दुकानांना आग लागली. ही आग एवढी मोठी होती की आग आटोक्यात आणण्यासाठी टोल नाक्याजवळील जॉली बोर्डची अग्निशमन वाहन बोलवण्यात आली. सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमनची गाडी येईपर्यंत दुकाने जळून खाक झाली होती.