मार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 19:40 IST2021-04-07T19:38:45+5:302021-04-07T19:40:59+5:30
Fire Sangli- शहरातील वसंतदादा पाटील मार्केट यार्ड येथील औषध गोदामास बुधवारी सकाळी आग लागली. तात्काळ या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्ननंतर ही आग आटोक्यात आली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग
ठळक मुद्देमार्केट यार्डातील शेती औषध गोदामास आग लाखोचे नुकसान: शॉर्टसर्किटमुळे आग लागली
संजय नगर /सांगली : शहरातील वसंतदादा पाटील मार्केट यार्ड येथील औषध गोदामास बुधवारी सकाळी आग लागली. तात्काळ या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्ननंतर ही आग आटोक्यात आली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील मार्केट यार्डतील वसंतदादा बँकेजवळ हे गोदाम आहे. त्याठिकाणी शेतीला लागणारी औषधांचा साठा करून ठेवण्यात आला आहे. गोदामास बुधवारी सकाळी आग लागली. तात्काळ या आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाच्या तीन बंबच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.