ऊस तोडणी मशिनला आग, दीड कोटींचे नुकसान; सुदैवाने जीवित हाणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 04:55 PM2022-01-23T16:55:59+5:302022-01-23T17:04:19+5:30

मशिनवर काम करणाऱ्या कामगारांनी प्रसंगाधान दाखवल्याने जीवितहानी टळली.

Fire at sugarcane harvesting machine, loss of Rs 1.5 crore; Fortunately there is no loss of life | ऊस तोडणी मशिनला आग, दीड कोटींचे नुकसान; सुदैवाने जीवित हाणी नाही

ऊस तोडणी मशिनला आग, दीड कोटींचे नुकसान; सुदैवाने जीवित हाणी नाही

googlenewsNext

बागणी येथे ऊस तोडणी मशिनला आग लागून सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नाही. तात्यासाहेब कोरे साखर कारखाना वारणा मार्फत बागणी येथील काळी मशिद परिसरात ऊस तोडणी मशिनच्या साहाय्याने सुरु होती, यावेळी ही दुर्घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी सुरू असताना मशिनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने मशिनला जवळच असलेल्या चौगले पोल्ट्री फार्मजवळ उभी करण्यात आली होती. यावेळी मशिनचे काम सुरू अशताना अचानक पेट घेतला. यावेळी दुरुस्ती करणारे व मशिनवर काम करणाऱ्या कामगारांनी प्रसंगाधान दाखवल्याने जीवितहानी टळली.

त्या ठिकाणी असलेल्या शेतकरी व तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतू आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आष्टा येथील अग्निशामक दलाची मदत घेण्यात आली. सुमारे तीन तास आगविझवण्याचे शर्तिचे प्रयत्न चालू होते. या सर्वामध्ये ऊसतोडणी मशिन पूर्ण जळून खाक झाली असून,  सुमारे दीड कोटींचे नुकान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

Web Title: Fire at sugarcane harvesting machine, loss of Rs 1.5 crore; Fortunately there is no loss of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.