शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ--लोकमतचा दणका

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

जिल्हा बँकेला जाग : जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, तालुक्यात समाधान

दरीबडची : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या अनागोंदी कारभारामुळे व महसूल विभागाच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील शेतकरी पीक विम्याला १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देऊनसुद्धा पीक विम्यापासून वंचित राहिले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विम्याच्या मुदतवाढीचा मुख्य शाखेकडून अध्यादेश आला नाही, असे कारण दाखवून पीक विमा भरून घेतला नाही. याबाबत ‘लोकमत’मध्ये १९ आॅगस्ट रोजी ‘पीक विम्यापासून शेतकरी वंचितच!’ ही बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बॅँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर बॅँकेने दरीबडची येथील शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करून ८ शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेतला आहे. ‘लोकमत’मुळे न्याय मिळाला आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजनेत प्रतिहेक्टर बाजरीसाठी २२४ रुपये, मूगसाठी ३०२ रुपये, भुईमूगसाठी ८३३ बँकेत भरायचे होते. पीक विम्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. शेतकरी व राजकीय नेत्यांनी पीक विम्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. काही भागामध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे शासनाने १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेने सर्व शाखांना पीक विम्याला मुदतवाढ मिळाल्याचे पत्र दिले होते. तसेच १ आॅगस्टनंतर पेरणी झाली आहे, असा तलाठी यांचा दाखला अनिवार्य केला होता. परंतु अनेक गावांमध्ये तलाठ्यांनी दाखला न दिल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता आले नव्हते. मुदतवाढ दिल्यानंतर जालिहाळ खुर्द येथील शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी कागदपत्रांसह गेले असता जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या दरीबडची शाखेने पीक विमा भरून घ्यायला नकार दिला. ‘पीक विम्यापासून शेतकरी वंचितच!’ ही बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुशवाह यांची भेट घेतली. त्यानंतर कुशवाह यांनी प्रशासकीय अधिकारी शैलेश कोतमिरे यांना चौकशीचे आदेश दिले. कोतमिरे यांच्याशीही शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर भीमराव माने, सुमन माने, बाळू सूर्यवंशी, तम्मा चव्हाण, वसंत चव्हाण, मनोहर चव्हाण, रामा सूर्यवंशी, भीमा सूर्यवंशी शेतकऱ्यांचा विमा बँकेने भरून घेतला. (वार्ताहर)‘लोकमत’च्या बातमीमुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही बॅँकेला दोनवेळा विनंती करून सुद्धा विम्याची रक्कम भरून घेतली नाही. बॅँकेच्या आडमुठेपणामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागले आहे. याची चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.- भीमराव माने, वंचित शेतकरी