आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 05:35 PM2021-07-21T17:35:44+5:302021-07-21T17:38:00+5:30

Politics Gopichand Padalkar Sangli :विधानपरिषदेचे आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर व निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे-भा.) अशा चार जणांविरूध्द विटा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी याबाबतची फिर्याद पोलीसांत दिली आहे.

Filed a case against MLA Gopichand Padalkar | आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन बाणूरगडावर स्मारकाचे भूमीपूजन

विटा (सांगली) : जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून बाणूरगड (ता.खानापूर) येथे बहिर्जी नाईक स्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी जास्त लोकांची उपस्थिती करीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते व विधानपरिषदेचे आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर व निलेश नेताजी पाटील (रा. खंबाळे-भा.) अशा चार जणांविरूध्द विटा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी याबाबतची फिर्याद पोलीसांत दिली आहे.

बाणूरगड येथे दि. १९ जुलै रोजी सायंकाळी पर्यटन विकास अंतर्गत बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा परिसर विकास व पर्यटन पायाभूत विकास कामाचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आॅनलाईन झाले. त्या कार्यक्रमाचे ठिकाणी माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह सुमारे १५० ते १७० जण उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या बंदी आदेशाचे उल्लघंन झाले होते. त्यामुळे भारतीय साथरोग अधिनियम १८९७ कलम ११, आपत्ती व्यवस्थान अधिनियम २००५ चे कलम ५१ अ प्रमाणे भाजपचे आ. गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर (दोघेही रा. पडळकरवाडी, ता.आटपाडी), सरपंच सज्जन बाबर (रा. बाणूरगड) व ठेकेदार निलेश पाटील (रा. खंबाळे-भा.) अशा चार जणांविरूध्द नायब तहसीलदार चेतन कोनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विटा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Filed a case against MLA Gopichand Padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.