पन्नास वर्षांत बारावेळा आला मान्सून उशिरा - : नऊवेळा जून कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:14 PM2019-06-18T23:14:02+5:302019-06-18T23:14:41+5:30

मागील पन्नास वर्षांत जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस तब्बल बारावेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊवेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले.

In the fifty years, twelve times the monsoon was delayed: - June nine dry | पन्नास वर्षांत बारावेळा आला मान्सून उशिरा - : नऊवेळा जून कोरडा

पन्नास वर्षांत बारावेळा आला मान्सून उशिरा - : नऊवेळा जून कोरडा

googlenewsNext
ठळक मुद्देपुनर्वसूचा ‘बेडूक’च पेरणीला तारण्याची शक्यता; जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त

अशोक डोंबाळे ।

सांगली : मागील पन्नास वर्षांत जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस तब्बल बारावेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊवेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले. यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरीही पावसाचे आगमन झाले नसल्यामुळे, त्याला उशीरच होण्याची शक्यता आहे. पुनर्वसूच्या बेडूक नक्षत्रावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे.

सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात दहा वर्षांपूर्वी साधारणपणे ७ ते १५ जूनच्यादरम्यान मान्सूनची सुरुवात होत असे. वटपौर्णिमेला कृष्णा व वारणा नदीला पूर येत होता. ओढे-नालेही भरलेले असायचे. ८ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यावर लगेच शेतकºयांची पेरणीची लगबग सुरू होत असे. साधारणपणे २५ जूननंतर पेरण्या होत होत्या. परंतु, मागील दहा वर्षांचा आढावा घेता मान्सूनचे आगमनच उशिरा होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात पडणाºया पावसाच्या आकडेवारीवरून तर ते स्पष्टच झाले आहे.

मागील ५० वर्षांचा आढावा घेता १९९० मध्ये मान्सून ५ जूनला आला होता, तर २००२ मध्ये २७ जुलैला आलेला मान्सून सर्वात उशिराचा ठरला. तब्बल दहा वर्षे मान्सूनचे आगमन जुलै महिन्यात झाले आहे. ३८ वर्षे मान्सूनचे आगमन ५ ते ३० जूनदरम्यान झाले. यंदा हवामान विभागाने सरासरी पावसाचे भाकित केले आहे. प्रत्यक्षात रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांची पेरणीपूर्व मशागत झालीच नाही. त्यासाठी मृग नक्षत्र उजाडले. मृगाचा पाऊस हलक्या स्वरूपात दोनच दिवस झाला. तोही जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पडला नाही. जिथे पाऊस झाला, तेथे मशागतीची लगबग वाढली आहे. २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होणार असून, त्याचे वाहन हत्ती असल्यामुळे शेतकºयांना चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. पाऊस चांगला झाला, तरच खरिपाच्या पेरण्या होणार आहेत.

खरीप पेरणीचा उत्तम कालावधी हा १५ जूनपर्यंतच असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. त्यापुढे म्हणजेच ३० जूनपर्यंत खरीप पेरणी करायची म्हटले तर दोन आठवड्यांचा उशीर होणार आहे. जास्तीत-जास्त शेतकºयांनी १५ जुलैपर्यंतच खरिपाची पेरणी करावी. त्यानंतरचा कालावधी पेरणी आणि त्या पिकासाठी योग्य नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
१५ जुलैनंतर पाऊस चांगला झाला, तर शेतकºयांनी खरीपऐवजी अन्य पिकाची पेरणी करावी अथवा रब्बीची वाट पाहणेच उत्तम आहे. मान्सून लांबल्यामुळे निसर्ग भाकितांना दाद देत नाही, हेच वास्तव आहे.

जिल्ह्यात खरीप पेरणी केवळ तीन टक्केच

जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण तीन लाख ४८ हजार ५०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. यापैकी दि. १८ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ तीन टक्केच पेरणी झाली आहे.

यामध्ये सर्वाधिक शिराळा तालुक्यात २७.९ टक्के पेरणी झाली असून त्यातही भाताच्या धूळवाफ पेरणीचा समावेश आहे. उर्वरित एकाही पिकाची पेरणी झाली नाही.

पलूस तालुक्यात ०.६ टक्के

वाळवा तालुक्यात ०.५ टक्के पेरणी झाली आहे.

यामध्ये नदीच्या पाण्यावर काही शेतकºयांनी सोयाबीनची टोकण केली आहे. उर्वरित सात तालुक्यात एक टक्काही पेरणी झाली नसल्यामुळे दुष्काळाची दाहकता स्पष्ट होत आहे. जून संपत आला तरीही पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

दहा वर्षातील जूनमधील पाऊस (मि.मी.)
वर्ष पाऊस

२००८ ५९.२
२००९ ५७
२०१० १६४.४
२०११ ८६.७
२०१२ ४८
२०१३ १०४.३
२०१४ ६५
२०१५ १२९.१
२०१६ १११.४
२०१७ ८२.१
२०१८ १०५.५


जिल्ह्यातील १८ जूनपर्यंतचा पाऊस (मिलिमीटर)
तालुका जून २०१८ जून २०१९

मिरज ५७.५ ८४.६
जत २४.४ ६१.७
खानापूर १४.६ १०५.२
वाळवा ४२.४ ५२.१
तासगाव ४६.६ २८.१
शिराळा ६२.१ ११०.१
आटपाडी ३४ २०.३
कवठेमहांकाळ १५.८ ३८.९
पलूस ३१.८ ७४.२
कडेगाव १८.४ १०६.६
सरासरी पाऊस ३६.५ ६८.५


आर्द्रा, पुनर्वसूवरच आता मदार...

यंदाच्या पावसाळ्यात ७ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची मदार आता २२ जूनपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रावरच असल्याचे दिसत आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्यामुळे चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ६ ते १९ जुलै या कालावधित पुनर्वसू नक्षत्र लागणार असून त्याचे वाहन बेडूक असल्यामुळे, पुनर्वसूचा बेडूक पाण्यात डुंबणार का, अशी चर्चा आहे.


मान्सूनपूर्व पावसाने घेतलेली विश्रांती आणि आता मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

Web Title: In the fifty years, twelve times the monsoon was delayed: - June nine dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.