शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

चांदोली धरणातील पाणी मेपर्यंत संपण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 3:27 PM

पावसाचे आगर समजल्या जाणाºया चांदोली धरण परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वारणेच्या पाण्याची उधळपट्टी सुरू आहे.

 

- गंगाराम पाटील

वारणावती : पावसाचे आगर समजल्या जाणाºया चांदोली धरण परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वारणेच्या पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. वारणेच्या कालव्यामार्फत शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी कालव्यांच्या दुरवस्थेमुळे वाया जात आहे. अशातच गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजच्या तारखेला धरणात ६.७४ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. सध्या धरणातून नदीमार्फत १ हजार ४१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दि. ११ एप्रिलअखेर हाच पाणीसाठा ९.३० टीएमसी आहे.

ही आकडेवारी पाहता, आठवड्यात एक टीएमसी पाणी कमी होत आहे. थोडक्यात, ही वस्तुस्थिती अशीच राहिल्यास मेअखेर धरणाच्या पाण्याने तळ गाठलेला असेल. साधारण १५ जूनपासून पावसाला सुरुवात होते, असा अंदाज बांधला, तर उर्वरित पंधरा दिवस वारणा पट्ट्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे. या ना त्या कारणाने पाण्याची मागणी वाढल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा लागणार आहे. हा विसर्ग वाढवला तर, मे महिन्याआधी ऐन उन्हाळ्यातच धरण कोरडे पडणार आहे.

चांदोली परिसरात गतवर्षी २ हजार ९६५ मिलिमीटर पाऊस पडला होता. धरणही शंभर टक्के भरले होते. गेल्या पंधरा-वीस वर्षांचा इतिहास पाहता, तीस जूनपर्यंत पुरेसा पाणीसाठा धरणात असायचा. यंदा मात्र नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ होणे स्वाभाविक आहे.

मात्र मागणीप्रमाणे पाणी सोडून पावसाळ्यापूर्वीच रखरखत्या उन्हात अर्थात मेमध्ये धरण कोरडे ठणठणीत करणे हे कितपत योग्य आहे? वरिष्ठ स्तरावर याचा विचार करून शिल्लक पाण्याचे योग्य ते नियोजन करणे  तसेच वारणा पट्ट्यातील नागरिकांनीही भविष्यातील पाणी टंचाई विचारात घेऊन वारणेच्या पाण्याचा जाब विचारणे गरजेचे   आहे. अन्यथा कधी नव्हे ते वारणा पट्ट्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईSangliसांगली