शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

Sangli News: भरधाव मोटारीची दुचाकीला धडक, अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 13:55 IST

एका दुचाकीशी धडक होता होता वाचली, दुसऱ्या दुचाकीला बसली

शिराळा : शिराळा - कोकरूड रस्त्यावर बिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथील बसस्थानकाजवळ भरधाव माेटारीने दुचाकीला धडक दिल्याने बाप-लेकीचा मृत्यू झाला. माेटारीच्या जाेरदार धडकेत दुचाकीवरील तृप्ती आत्माराम पवार (वय २८, रा. इस्लामपूर) जागीच ठार झाली, तर तिचे वडील आत्माराम विष्णू पवार (वय ६०, रा. इस्लामपूर) यांचा कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात काल, रविवारी (दि. २८) दुपारी घडला.साेलापूर येथील डॉ. अल्पेश शिवाजी खडतरे (वय ३८, रा. विजापूर रोड) हे आपल्या कुटुंबासह माेटारीतून क्र. (एमएच १३, बीएन २८१६) रत्नागिरीहून सोलापूरकडे निघाले हाेते. तर आत्माराम पवार व त्यांची मुलगी तृप्ती घरगुती कामासाठी दुचाकीवरून क्र. (एमएच १०, एई ३८०९) इस्लामपूरहून कोकरूडला निघाले होते.दरम्यान, बिऊर-शांतीनगर येथील बसस्थानकापासून काही अंतरावर दाेन्ही वाहनांची समाेरासमाेर भीषण धडक झाली. यामध्ये तृप्ती ही दुचाकीवरून उडून रस्त्यावर फेकली गेली तर आत्माराम पवार हे माेटारीवर जाऊन आदळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने तृप्तीचा जागीच मृत्यू झाला. आत्माराम यांनाही डोक्याला दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांच्यासह नातेवाईकांनी  शिराळा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या अपघाताबाबत धैर्यशील पाटील यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक अविनाश वाडेकर करत आहेत.उच्चशिक्षित तृप्ती ही पुणे येथील खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत हाेती. सुटी असल्याने ती इस्लामपूरला आली हाेती. आत्माराम हे प्रगतशील शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. शिराळा पाेलिस ठाण्यात अपघाताची नाेंद झाली आहे.एक अपघात टळला पण क्षणार्धात दुसरा झालाच..या अपघातापूर्वी खडतरे यांच्या माेटारीची दुसऱ्या एका दुचाकीशी धडक होता होता वाचली. यानंतर काही क्षणातच त्यांच्या माेटारीची आत्माराम पवार यांच्या दुचाकीला धडक बसली.अपघाताची माहिती मिळताच मृत तृप्तीचा भाऊ अनिकेत उपजिल्हा रुग्णालयात आला. या ठिकाणी एका खोलीत तृप्तीचा मृतदेह ठेवला होता. मित्रांनी त्याला तृप्तीचा मृत्यू झाल्याचे न सांगता तिला उपचारासाठी कऱ्हाडला नेल्याचे सांगितले. तसेच वडील आत्माराम यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याचे लांबून दाखविले. यावेळी अनिकेतला आवरणे उपस्थितांना अवघड झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू