शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सुसेरीत शेतकऱ्याचा दागिन्यासाठी खून

By admin | Updated: February 2, 2015 23:41 IST

त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या गायब झाल्या आहेत.

खेड : खेड तालुक्यातील सुसेरी गावातील संतोष बाळकृष्ण केसरकर (वय ५०) या शेतकऱ्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी गावातील खेमनाथ मंदिरानजीक आढळल्याने खळबळ उडाली आहे. गळा दाबून त्यांचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे दागिन्यांसाठी केसळकर यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संतोष बाळकृष्ण केसरकर हे शेळ्यांना चरविण्यासाठी गावातील रानात घेऊन गेले होते. मात्र, ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली. तेव्हा त्यांचा मृतदेह खेमनाथ मंदिरानजीक आढळला. तिने तातडीने ही माहिती ग्रामस्थांना व त्यानंतर पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, पोलीस निरीक्षक अशोक जांभळे तसेच पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ आपल्या सहकाऱ्यांसह सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे घटनेची माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तास उशिराने पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत हा पंचनामा सुरूच असल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, केसरकर यांच्या अंगावरील दागिने गायब होते. त्यामुळे त्यांचा दागिन्यांसाठी खून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)