शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा मतदारसंघात विकासकामे करुनही अपयश : सत्यजित देशमुख

By admin | Updated: November 12, 2014 22:58 IST

ढील काळात स्वार्थी प्रवृत्तींना बाजूला सारून झुंजार कार्यकर्त्यांची बांधणी करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे,

सागाव : शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासकामे करुन देखील अपयशाला सामोरे जावे लागले, याची खंत वाटते. एवढी वर्षे शिवाजीराव देशमुख यांनी लोकांसाठी अहोरात्र काम केले. परंतु लोकांनी फक्त आमच्याकडून फायदाच बिघितला. यापुढील काळात स्वार्थी प्रवृत्तींना बाजूला सारून झुंजार कार्यकर्त्यांची बांधणी करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.शिराळा येथे शिराळा तालुक्यातील कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. तालुका काँग्रेस अध्यक्ष हणमंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख, के. डी. पाटील, प्रतापराव यादव, महादेव कदम, सभापती चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सत्यजित देशमुख म्हणाले की, ५00 कोटींची कामे आम्ही केली. परंतु लोकांनी विकास कामांना महत्त्व दिले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. विरोधकांनी दाखविलेल्या खोट्या आश्वासनांमुळे व वारेमाप पैशाच्या वापरामुळे तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची ऐनवेळी आघाडी तुटली आणि अचानक उमेदवारीस सामोरे जावे लागले. प्रचाराला वेळ कमी मिळाला. लोकांपर्यंत पोहोचण्यात कार्यकर्ते कमी पडले. यापुढील काळात स्वार्थी कार्यकर्त्यांना बाजूला सारुन झुंजार कार्यकर्त्यांची बांधणी करुन संघटना मजबूत करणार आहे.हणमंतराव पाटील म्हणाले की, निवडणूक निकालानंतर अनेक अफवा व गैरसमज पसरविण्यात आले. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. गेली २५ वर्षे पक्षाचे व प्रशासनातील नेतृत्व मी करतोय. राजकारणात कोण कोणाला संपवू शकत नाही. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर जो तो मोठा होत असतो.संपतराव देशमुख, पी. वाय. पाटील, अभिजित पाटील, विकास नांगरे, प्रजित यादव, निवृत्ती नरुटे, बी. जी. पाटील, सुभाष पाटील, कैलास पाटील, हरेष पाटील, विषाल घोलप, शारदा घारगे, नारायण खोत, तानाजी पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)