कालबाह्य बसेस १९१, लालपरी आल्या ४०, एसटी बसेस संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 14:23 IST2019-10-07T14:19:34+5:302019-10-07T14:23:00+5:30

सांगली जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या १९१ बसेस असून, महामंडळाकडून केवळ लालपरीच्या ४० नवीन बसेस मिळाल्या आहेत. नवीन बसेसच नसल्यामुळे कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, या प्रशासनाच्या धोरणामुळे जिल्ह्याची लाल परी सध्या संकटात सापडली आहे.

Expired buses 1949, Lalpari arrived | कालबाह्य बसेस १९१, लालपरी आल्या ४०, एसटी बसेस संकटात

कालबाह्य बसेस १९१, लालपरी आल्या ४०, एसटी बसेस संकटात

ठळक मुद्देकालबाह्य बसेस १९१, लालपरी आल्या ४०एसटी बसेस संकटात

सांगली : जिल्ह्यात ८२६ एसटी बसेसपैकी दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या १९१ बसेस असून, महामंडळाकडून केवळ लालपरीच्या ४० नवीन बसेस मिळाल्या आहेत. नवीन बसेसच नसल्यामुळे कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एकीकडे विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांच्या विकासाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे कालबाह्य बसेस प्रवाशांच्या सेवेत ठेवायच्या, या प्रशासनाच्या धोरणामुळे जिल्ह्याची लाल परी सध्या संकटात सापडली आहे.

तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडता येत नाहीत. पण, बसेसच नसल्यामुळे नियम मोडून चार ते पाच लाख किलोमीटर धावलेल्या आणि पाच ते सहा वर्षाच्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर जात आहेत. जिल्ह्यातील आगारांकडे सध्या ८२६ बसेस आहेत. त्यापैकी १९१ बसेस दहा ते तेरा वर्षे वापरलेल्या आहेत.

नवीन बसेस मिळत नसल्याने जुन्याच बसेस दुरूस्त करून प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. या बसेसही रोज १०० ते २०० किलोमीटर अंतर धावून येत आहेत. या बसेस कधी रस्त्यातच बंद पडत आहेत, तर कधी गळक्या छतामुळे पावसाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत आहे. एसटीच्यासांगली विभागाकडे कालबाह्य बसेसची १९१ संख्या असताना, महामंडळाकडून सहा महिन्यात केवळ ४० लालपरी बसेस मिळाल्या आहेत. स्टील बॉडीच्या या नवीन बसेस प्रवाशांच्या पसंतीस मात्र उतरल्या नाहीत.

आगारांकडे नवीन बसेस नसल्यामुळे लांबच्या मार्गावरही जुन्याच बसेस पाठवाव्या लागत आहेत. महामंडळाच्या नियमानुसार तीन लाख किलोमीटरपेक्षा कमी पळालेल्या बसच लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठविण्याचा नियम आहे. परंतु, मागील दोन वर्षात फारशा नवीन बसची खरेदी झालेली नाही. यामुळे सध्या एसटीच्या ताफ्यातील ८२६ बसेसपैकी ९५ टक्के बसेस तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या आहेत.

सांगली, मिरज आगारातून रोज पुणे, नाशिक, नांदेड, सोलापूर, परभणी, अहमदनगर, बारामती मार्गावर अनेक जुन्या बसेस धावत आहेत. या मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसची संख्याही जास्त आहे. बसेस चांगल्या असल्यामुळे एसटीचा प्रवासी तिकडे जाताना दिसत आहे.

Web Title: Expired buses 1949, Lalpari arrived