पर्यावरण तज्ज्ञ अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 23:35 IST2024-01-03T23:28:08+5:302024-01-03T23:35:59+5:30
बाबा आमटे यांचे 'आनंदवन', प्रकाश आमटे यांचे 'हेमलकसा' या प्रकल्पाशी त्यांचा संबंध होता.

पर्यावरण तज्ज्ञ अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन
सांगली- शहरातीलप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ आणि मानद वन संरक्षक अजित उर्फ पापा पाटील यांचे बुधवार दि. ३ रोजी रात्री दु:खद निधन झाले. नुकत्याच झालेल्या राज्य पक्षी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या अजित पाटील यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या होत्या. कृष्णा आणि इंद्रावती मोहिमेतही ते सहभागी होते.
बाबा आमटे यांचे 'आनंदवन', प्रकाश आमटे यांचे 'हेमलकसा' या प्रकल्पाशी त्यांचा संबंध होता. सांगली जिल्ह्यातील चांदोली व्याघ्र प्रकल्पसाठी त्यांचे योगदान मोठे होते. अंत्यविधी उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता अमरधाम, सांगली येथे करण्यात येणार आहे.