Sangli: ‘ते माझे आई-वडील, मी काहीही करीन; चिडून तरुणाने चावा घेत शेजाऱ्याला केले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 16:42 IST2023-04-25T16:42:13+5:302023-04-25T16:42:31+5:30

कडेगाव पोलिसात नोंद

Enraged, the young man took a bite and injured his neighbor in sangli | Sangli: ‘ते माझे आई-वडील, मी काहीही करीन; चिडून तरुणाने चावा घेत शेजाऱ्याला केले जखमी

Sangli: ‘ते माझे आई-वडील, मी काहीही करीन; चिडून तरुणाने चावा घेत शेजाऱ्याला केले जखमी

कडेगाव : विहापूर (ता. कडेगाव) येथे आई-वडिलांना का मारतोस अशी विचारणा केल्याने चिडून एकाला चावा घेऊन जखमी केले. ही घटना शनिवारी दि. २२ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

बापू शंकर कोकाटे (वय ४५ रा. विहापूर) असे जखमीचे नाव आहे. याबाबत त्यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली असून संशयित सोमनाथ मोहन चव्हाण (वय २८ रा. विहापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
विहापूर येथे शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास संशयित सोमनाथ चव्हाण हा त्याच्या आई-वडील यांना मारहाण करीत असताना त्यास फिर्यादी बापू कोकाटे यांनी ‘तू तुझ्या आई-वडिलांना का मारहाण करतोस, मारहाण करू नको’ असे समजावून सांगत होते.

यावेळी सोमनाथ याने ‘ते माझे आई-वडील आहेत. मी काहीही करीन. तुम्ही यात भाग घेऊ नका’ असे सुनावले. तसेच सोमनाथ याने बापू कोकाटे यांच्या डाव्या हाताचे मनगटावरती चावा घेऊन व मानेला डाव्या बाजूला नखाने ओरबडून जखमी केले. या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी हे करीत आहेत.

Web Title: Enraged, the young man took a bite and injured his neighbor in sangli

टॅग्स :Sangliसांगली