Sangli News: डीपीला नोटांच्या बंडलसह स्वतःचा फोटो ठेवून वाहिली श्रद्धांजली, अन् युवकाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:20 IST2023-03-22T16:19:49+5:302023-03-22T16:20:20+5:30
आत्महत्येचे नेमके कारण काय? पोलिस तपास सुरु

Sangli News: डीपीला नोटांच्या बंडलसह स्वतःचा फोटो ठेवून वाहिली श्रद्धांजली, अन् युवकाने संपवले जीवन
आष्टा : वाळवा येथील फळ विक्रेत्या युवकाने स्वतःलाच श्रद्धांजली वाहून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. योगेश सचिन फाळके (वय २०, रा. बाराबीगा, वाळवा) असे त्याचे नाव आहे.
योगेश फाळके डाळिंब विक्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी रात्री त्याने घराजवळील कौलारू शेडमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवरील व्हॉटसॲपच्या डीपीला नाेटांच्या बंडलसह स्वतःचा फोटो व त्यावर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मजकूर लिहिला होता. त्याच्या पश्चात दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ संदीप फाळके याने आष्टा पोलिसात वर्दी दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक आप्पासाहेब बाबर अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, डाळींब विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या योगेशने नक्की का आत्महत्या केली, याचा तपास पोलिस करत आहेत.