शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नेर्ले सोसायटीत ३ लाख ४० हजारांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

कासेगाव : नेर्ले (ता. वाळवा) येथील नेर्ले क्र. १ सेवा सोसायटीमध्ये कर्ज प्रकरणासाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ...

कासेगाव : नेर्ले (ता. वाळवा) येथील नेर्ले क्र. १ सेवा सोसायटीमध्ये कर्ज प्रकरणासाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ३ लाख ४० हजार ५०० रुपयांचा अपहार करून सोसायटी व जिल्हा बँक शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्ष, तत्कालीन सचिव व तत्कालीन बँक निरीक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

उपलेखापरीक्षक मानसिंग शिवाजीराव देसाई यांनी कासेगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

याबाबतची माहिती अशी, २५ एप्रिल २०१६ रोजी सोसायटी क्रमांक एकने रविराज पाटील यांना दीड लाख रुपये, श्रीमती शैलजा प्रकाश पाटील यांना दीड लाख रुपये, तर प्रसन्ना प्रकाश पाटील यांना ६५ हजार रुपये असे एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी रविराज पाटील यांना १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा धनादेश दिला होता. रविराज पाटील यांनी रोख रक्कम काढल्याचे भासवून निरीक्षक दिलीप आरळेकर यांनी त्यांचा अकाउंट पे धनादेश खात्यामध्ये जमा केला नाही. अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी खात्यात अनधिकृत जमा झालेले एक लाख तीस हजार रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.

रविराज पाटील यांची नावे खोटी व बनावट कागदपत्रे सचिव जयवंत हनुमंत पाटील यांनी अध्यक्षांना मदत करण्याच्या दृष्टीने तयार केली. बॅँक निरीक्षक आरळेकर यांनी पडताळणी न करता रक्कम अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या नावे जमा करण्याकरिता मदत केली. सह्या व कागदपत्रे बनावट असतानाही निरीक्षक यांनी बेपर्वाई केली. संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव गुंडा पाटील, तत्कालीन सचिव जयवंत हणमंत पाटील व जिल्हा बँक निरीक्षक दिलीप लक्ष्मण आरळेकर या तिघांनी मिळून संगनमत करून नेर्ले क्र. १ सर्व सेवा सहकारी सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची ३ लाख ४० हजार ५०० रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद उपलेखा परीक्षक देसाई यांनी कासेगाव पोलिसांत दिली आहे.