शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंहपूर येथे ४३ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

इस्लामपूर : नरसिंहपूर (ता. वाळवा) येथील दोघांनी विजेच्या मीटरमध्ये फेरफार करून तब्बल ४३ हजारांची रुपयांची वीजचोरी केल्याची घटना उघडकीस ...

इस्लामपूर : नरसिंहपूर (ता. वाळवा) येथील दोघांनी विजेच्या मीटरमध्ये फेरफार करून तब्बल ४३ हजारांची रुपयांची वीजचोरी केल्याची घटना उघडकीस आली. वीज वितरणच्या स्थानिक भरारी पथकाने छापे मारून ही वीजचोरी उघड केली.

नंदकुमार मनोहर बारटक्के आणि सोमनाथ रामचंद्र मोहिते (दोघे रा. नरसिंहपूर) अशी वीजचोरी करणाऱ्यांची नावे आहेत. या दोघांवर बारा महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. बारटक्के यांनी १.५९२ केडब्ल्यू इतक्या भाराची २२ हजार ७९० रुपयांची वीजचोरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, तर सोमनाथ मोहिते यांनी बारा महिन्यांच्या कालावधीत १९ हजार ६३० रुपये किमतीची एक हजार ४९९ युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांविरुद्ध विद्युत कायदा कलमाखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यात कनिष्ठ अभियंता किशोर रामदास निकम यांनी फिर्याद दिली आहे.

निकम यांच्यासह कनिष्ठ अभियंता प्राची गायकवाड, मयूर दाभोळे, कर्मचारी सुनील मडावी, कंत्राटी कर्मचारी सूरज चिवटे यांच्या पथकाने २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बारटक्के आणि मोहिते यांच्या घरी छापा टाकून तेथील वीज मीटरची तपासणी केली होती. त्यावेळी दोघांनीही विजेच्या मीटरमध्ये फेरफार करून ही वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.