शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ९० लाखांची वीज चोरी; कशी केली चोरी, ग्राहकांची संख्या किती.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:34 IST

महावितरणकडून वीज ग्राहकांवर कारवाई

सांगली : महावितरणच्या विद्युत तारावर हूक टाकून, मीटरमध्ये छेडछाड करून आणि घरगुती वीज कनेक्शन घेऊन व्यावसायिक वापर करण्याचे ४५७ वीजचोरीचे प्रकार महावितरणच्या पथकाने उजेडात आणले. ही वीज चोरी ९० लाख १३ हजार रुपयांची आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात वीज चोरीच्या घटना वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. या तक्रारींनुसार महावितरणकडून विशेष भरारी पथके तयार केली होती. या पथकाने २०२४ या आर्थिक वर्षात ४५ वीज ग्राहकांनी घरगुती विद्युत कनेक्शन घेऊन त्याचा व्यावसायिक वापर केला होता. या ग्राहकांनी नऊ लाख ४६ हजार रुपयांची वीज गैरमार्गाने वापर केला आहे, तसेच महावितरणच्या विद्युत तारांवर हूक टाकून विजेचा वापर करणारे २६८ वीज ग्राहक आढळून आले आहेत.

या ग्राहकांनी ३६ लाख ४१ हजार रुपयांची वीज चोरी केली आहे, तसेच मीटरमध्ये बदल करून वीज वापरणारे १४४ वीज ग्राहक दिसून आले आहेत. या ग्राहकांनी ४४ लाख २६ हजार रुपयांची वीज चोरी केली होती. या वीज चोरांवर महावितरणच्या पथकाने विशेष कारवाई करून संबंधितास दंडासह वीज बिलाची रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे. दंडासह रक्कम न भरल्यास संबंधित वीज वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वीजचोरांची संख्यावीजचोरीचा प्रकार - ग्राहक संख्या - वीज चोरीची रक्कम

  • हूक टाकून चोरी - २६८  - ३६४१०००
  • घरगुतीचा व्यावसायिक वापर - ४५ - ९४६०००
  • मीटरमध्ये बदल - १४४ - ४४२६०००
टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरणelectricityवीजtheftचोरी