शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
4
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
5
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
6
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
8
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
9
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
10
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
11
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
12
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
13
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
14
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
15
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
16
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
17
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
18
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
19
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
20
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत वीजबिल घोटाळा झाला, पण कुणीच नाही पाहिला; एसआयटीच्या अहवालाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:09 IST

अहवालात महापालिकेसह महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्लीन चिट?

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत साडेतीन कोटी रुपयांचा वीजबिल घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांनी एसआयटी नियुक्त केली. या एसआयटीचा अहवाल नुकताच सादर झाला आहे. या अहवालात महापालिकेसह महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्लीन चिट दिल्याचे समजते. प्रत्यक्षात एसआयटीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच घोटाळ्याचे पैलू समोर येतील. अहवालात अधिकारी, कर्मचारी सुटले असतील तर मग हा घोटाळा कोणी केला, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.चार वर्षांपूर्वी महापालिकेत वीजबिल घोटाळा उघडकीस आला. तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीतील वीजबिलाचे विशेष लेखापरीक्षण केले. त्यात १ कोटी २९ लाख रुपयांचा घोटाळा समोर आला. त्यानंतर सामाजिक संघटनांनी घोटाळ्याविरोधात आवाज उठवत दहा वर्षांतील बिलाची पडताळणी करण्याची मागणी केली.महापालिकेने पाच वर्षांतील बिलांचे ऑडिट केल्यानंतर हा घोटाळा ३ कोटी ४५ लाखापंर्यंत पोहोचला. प्रत्यक्षात घोटाळ्याचा आकडा अधिक असल्याचा आरोपही झाला. याप्रकरणी महावितरणकडील मानधनवरील कर्मचारी, वीजबिल भरणा केंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण हे प्रकरण पुढे सरकले नाही.

त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे, सतीश साखळकर, तानाजी रूईकर यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली. लोकायुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसआयटी नियुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त व चार्टर्ड अकाउंटंट याची समिती नियुक्त करण्यात आली. या एसआयटीच्या समितीने आपला अहवाल लोकायुक्तांकडे सादर केला आहे.या अहवालात महापालिका व महावितरणाच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिल्याचे सांगण्यात येत आहे. एसआयटीने महापालिका अधिकाऱ्यांचे बॅक डिटेल्स, काॅल डिटेल्स काढले. त्यात संशयितांसोबत कुठेच संबंध आढळून आला नसल्याचे समजते. पण साऱ्या भानगडीत घोटाळा कुणी केला? याचे उत्तर मात्र अद्याप समोर आले नाही.

कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करणार :सतीश साखळकरवीजबिल घोटाळा हा महापालिका तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे. याविरोधात आम्ही नगरविकास सचिव, लोकायुक्तांकडे तक्रार केली. अखेर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एसआयटी नेमण्यात आली. त्यांच्या चौकशीला दोन ते अडीच वर्षांचा काळ लोटला. आता अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्लीन चिट दिल्याचे समजते. मग हा घोटाळा कोणी केला? महावितरणचे व महापालिकेचे अधिकारी कर्मचारी सामील असल्याशिवाय घोटाळा होणे शक्य नाही. विद्युत, लेखापरीक्षण व लेखा विभाग झोपला होता का? एसआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation Electricity Bill Scam: No one saw, SIT report awaited.

Web Summary : A 3.5 crore electricity bill scam in Sangli Municipal Corporation faces scrutiny. An SIT report, recently submitted, seemingly gives a clean chit to officials. Citizens question who committed the fraud as an appeal to Kolhapur Bench is planned.