शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७२ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST

सांगली : मुदत संपलेल्या जिल्ह्यातील अ वर्गातील ७२ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग शासन आदेशाने मोकळा झाला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम ...

सांगली : मुदत संपलेल्या जिल्ह्यातील अ वर्गातील ७२ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग शासन आदेशाने मोकळा झाला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम २० सप्टेंबरला जाहीर होणार आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांना सोमवारी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अ वर्गातील ७२ सहकारी संस्थांची निवडणूक होणार आहे. याच वर्गातील एका सहकारी बँकेवर सध्या प्रशासक असल्याने ती संस्था वगळून अन्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या २० सप्टेंबरला जाहीर होईल. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीसाठी सध्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम सुरू आहे. त्याची प्रक्रिया यापूूर्वीच सुरू झाल्याने बँकेचा निवडणूक कार्यक्रमही लवकरच जाहीर होईल.

कोरानामुळे राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची निवडणूक आतापर्यंत पाच वेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. ऑगस्टअखेरपर्यंत ही मुदतवाढ होती. ती संपताच आता तत्काळ निवडणुका घेण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत.

जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या १५२८ सहकारी संस्था आहेत. जिल्हा बँक, पलूस व जत अर्बन बँक, तसेच विकास सोसायट्या, दूध संस्था, खरेदी-विक्री संस्था व अन्य सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक विभागीय सहनिबंधकांच्या अखत्यारीत आहे, तर अन्य संस्थांची निवडणूक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून होणार आहे. क व ड वर्गातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया तालुका उपनिबंधकांच्या अखत्यारीत होणार आहे.

कोट

शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. नामनिर्देशनपत्रांची प्रक्रिया सुरू होऊन थांबलेली एकही संस्था आपल्याकडे नाही. त्यामुळे ७२ संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित टप्प्यापासून सुरू होईल.

- नीळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सांगली