शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli-Bullock cart race: उधळलेली बैलगाडी धडकून वृद्ध ठार, पळापळीत १३ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:20 IST

शर्यतीला गालबोट, स्पर्धेसाठी लाखो शौकिनांची गर्दी

सांगली/कवठेमहांकाळ : बोरगाव (ता.कवठेमहांकाळ) येथे रविवारी आयोजित देशातील सर्वात मोठ्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीमध्ये ‘आदत’ गटातील तीन-चार बैलगाड्या धावपट्टी सोडून बाहेर उधळल्या. त्यावेळी शर्यत बघण्यासाठी आलेल्यांची पळापळ सुरू झाली. रस्त्याच्या कडेला चहा पित थांबलेल्या अंबाजी शेखू चव्हाण (वय ६०, रा.बुद्देहाळ ता.सांगोला, जि.सोलापूर) यांना बैलगाडीची जोरदार धडक बसल्याने ते गंभीर जखमी होऊन ठार झाले. सकाळी ११च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत जवळपास १३ जण जखमी झाले आहेत.बोरगाव येथे रविवारी सकाळपासून वेगवेगळ्या जिल्ह्यातून लाखो शौकिनांनी गर्दी केली होती. सकाळी ११च्या सुमारास पहिल्या टप्प्यात ‘आदत’ गटाच्या बैलगाडी शर्यती सुरू झाल्या. या शर्यती पाहण्यासाठी धावपट्टीच्या शेजारी हजारो शौकिनांची गर्दी झाली होती. शर्यत सुरू असताना बैल बुजल्यामुळे धावपट्टी सोडून तीन-चार गाड्या बाहेर उधळल्या.बैलगाडीपासून बचाव करण्यासाठी शौकिनांची पळापळ सुरू झाली. धावपट्टीपासून काही अंतरावर रस्त्याकडेला शर्यत पाहण्यासाठी आलेले अंबाजी चव्हाण हे चहा पित थांबले होते. उधळलेली बैलगाडीने अंबाजी यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्यास दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले.काही वेळात बैलगाड्यांना आवरल्यानंतर जखमींभोवती शौकिनांची गर्दी झाली. बैलगाड्यांच्या धडकेत जवळपास १३ जण जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. यापैकी अंबाजी चव्हाण हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. उपचार सुरू असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात आले.

बुद्देहाळवर शोककळाअंबाजी यांचा जनावरे पाळण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. बुद्देहाळ येथे दुपारी त्यांच्या अपघाती मृत्यूची माहिती कळताच शोककळा पसरली. सायंकाळी उशिरा विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

मित्रासोबत आले होते शर्यती पाहायलाबुद्देहाळ (करांडेवाडी) येथील मृत अंबाजी चव्हाण व तानाजी भगवान करांडे असे दोघे जण मिळून करांडेवाडी येथून काल रविवारी सकाळी आठ वाजता दुचाकीवरून बोरगाव तालुका कवठेमहांकाळ येथे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आले होते

शर्यतीला गालबोटबोरगाव येथील बैलगाडी शर्यतीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे लक्ष लागून राहिले होते. आलिशान गाड्यांच्या बक्षिसामुळे त्याचे आकर्षण होते, परंतु याच बैलगाडी शर्यतीच्या वेळी एका शौकिनाचा अपघाती बळी गेल्यामुळे शर्यतीला गालबोट लागल्याची चर्चा रंगली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Bullock Cart Race Turns Fatal: Elderly Man Killed, 13 Injured

Web Summary : A tragic accident at a Sangli bullock cart race resulted in the death of an elderly spectator after being hit by a runaway cart. Thirteen others sustained injuries during the chaos as carts veered off course at Borgaon, Kavthemahankal. The incident cast a pall over the popular event.